TRENDING:

Indian Coast Guard मध्ये नोकरीची संधी, पगार तब्बल 2 लाख रुपये, कसं कराल अप्लाय?

Last Updated:

भारतीय तटरक्षक दलात नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलाने वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतीय तटरक्षक दलात नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तटरक्षकदलाने वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी (लॉजिस्टिक्स), नागरी कर्मचारी अधिकारी (लॉजिस्टिक्स), सहाय्यक संचालक (राजभाषा), सेक्शन ऑफिसर, नागरी राजपत्रित अधिकारी (लॉजिस्टिक्स), स्टोअर फोरमन आणि स्टोअर कीपर ग्रेड-1 पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलीय. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार तटरक्षक दलाची अधिकृत वेबसाइट indiancoastguard.gov.in जाऊन अर्ज करू शकतात.
Indian Coast Guard मध्ये नोकरीची संधी, पगार तब्बल 2 लाख रुपये, कसं कराल अप्लाय?
Indian Coast Guard मध्ये नोकरीची संधी, पगार तब्बल 2 लाख रुपये, कसं कराल अप्लाय?
advertisement

तटरक्षक दलाच्या या भरती प्रक्रियेतून एकूण 38 पदं भरली जातील. यामध्ये वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी (लॉजिस्टिक्स) ची 3 पदं, नागरी कर्मचारी अधिकारी (लॉजिस्टिक्स) 12 पदं, सहाय्यक संचालक (राजभाषा) 3 पदं, सेक्शन ऑफिसर 7 पदं, नागरी राजपत्रित अधिकारी (लॉजिस्टिक्स) 8 पदं, स्टोअर फोरमन 2 पदं आणि स्टोअर कीपर ग्रेड वनच्या 3 पदांचा समावेश आहे. जर तुम्हीही या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल.

advertisement

वयोमर्यादा किती?

अधिकृत नोटिफिकेशननुसार तटरक्षकदलाच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 56 वर्षे असावं. तसेच या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची शैक्षणिक आणि इतर पात्रता काय असावी, याबाबत तटरक्षक दलाची अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

पगार किती मिळेल?

वरिष्ठ नागरी कर्मचारी अधिकारी (लॉजिस्टिक्स) पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 78800 ते 209200 रुपये, नागरी कर्मचारी अधिकारी (लॉजिस्टिक्स) पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 67700 ते 208700 रुपये, सहाय्यक संचालक (राजभाषा) पदासाठी 56100 ते 177500 रुपये, सेक्शन ऑफिसर पदासाठी 9300 ते 34800 रुपये, नागरी राजपत्रित अधिकारी (लॉजिस्टिक्स) पदासाठी 44900 ते 142400 रुपये, स्टोअर फोरमन पदासाठी 35900 ते 142400 रुपये पगार मिळेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

सरकारी नोकरी मिळावी, हे जवळपास प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी अनेकजण तयारी करतात. परंतु सरकारी नोकरीच्या भरती प्रक्रियेचे माहिती वेळेवर न मिळाल्याने अनेकदा अर्ज करायचे राहून जाते. मात्र सध्या भारतीय तटरक्षक दलाची भरती प्रक्रिया सुरू असून पात्र उमेदवार अर्ज करून या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

मराठी बातम्या/करिअर/
Indian Coast Guard मध्ये नोकरीची संधी, पगार तब्बल 2 लाख रुपये, कसं कराल अप्लाय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल