एकूण किती पदे?
तंत्रज्ञ, पदवीधर आणि व्यापार अप्रेंटिसच्या एकूण 382 पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जदारांना कोणत्याही लेखी परीक्षेला बसावे लागणार नाही.
कोण अर्ज करू शकतो?
सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये शैक्षणिक पात्रता जसे की, 10वी, 12वी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा.तर काही पदांसाठी, उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अनुभव देखील असणे आवश्यक आहे. पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जाहीर झालेल्या भरती अधिसूचनेची तपासणी करू शकतात
advertisement
वयोमर्यादा किती आहे?
अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. तथापि, अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 29 वर्षे, ओबीसी-एनसीएल उमेदवारांसाठी 27 वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी 10 वर्षे वयोमर्यादा सूट आहे.
अर्ज कसा करावा?
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना NAPS/NATS पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर, प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्ज करावा लागेल. तसेच तुम्ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वेबसाइटला भेट देऊन रिक्त पदांची सूचना तपासू शकता.
निवड प्रक्रिया काय आहे?
शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर तयार केलेल्या गुणवत्तेच्या आधारे अर्जदारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तंदुरुस्ती चाचणीसाठी बोलावले जाईल.
