इंडिया पोस्टने 10 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर (indiapost.gov.in) जाऊन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मार्च 2025 आहे. अर्जदारांनी वेळेवर प्रक्रिया पूर्ण करावी, कारण ही एक मोठी भरती आहे आणि अर्जासाठी मर्यादित कालावधी उपलब्ध आहे.
एकूण रिक्त पदे - 21,413
advertisement
ब्रँच पोस्ट मास्तर (BPM)
असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर (ABPM)
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, अर्ज करणाऱ्यांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.
पगार आणि भत्ते
इंडिया पोस्टच्या ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी वेतनश्रेणी खालीलप्रमाणे आहे:
ब्रँच पोस्ट मास्तर (BPM): 12,000 ते 29,380 रु. प्रति महिना
असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर (ABPM) / डाक सेवक: 10,000 ते 24,470 रु प्रति महिना
निवड प्रक्रिया कशी होणार?
उमेदवारांची निवड 10वी परीक्षेतील गुणांच्या आधारे करण्यात येईल. गुणवत्तेनुसार मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना अधिकृत सूचना पाठवण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आणि ईमेलवर संदेशाद्वारे माहिती दिली जाईल.
अर्ज शुल्क किती?
सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क: 100 रु
SC/ST, महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही
शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिला जाईल. सर्व प्रमुख क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI पेमेंट्सचा वापर करून अर्ज शुल्क भरता येईल.
अर्ज कसा करावा?
अधिकृत संकेतस्थळ (indiapost.gov.in) वर जा.
"Recruitment" विभागात जाऊन संबंधित पद निवडा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज भरा.
ऑनलाइन पेमेंट करून अर्ज सादर करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा.
