TRENDING:

15 दिवस, 8000km, 25 रुपये तिकिट, वर्षातून एकदाच धावणाऱ्या ट्रेनची जर्नी बदलेल 'आयुष्याचा प्रवास'

Last Updated:

जागृती यात्रेद्वारे 500 तरुण तरुणींना भारत दर्शन घडवलं जातं. ही एक वार्षिक सहल आहे. 15 दिवसांच्या या यात्रेत 8000 किलोमीटरचा प्रवास घडतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली : रेल्वेचा प्रवास वेगवान, आरामदायक आणि परवडणारा असतो. त्यामुळे प्रवासाचा पल्ला लांबचा असो की जवळचा, रेल्वे नेहमीच भारतीयांना आपलीशी वाटते. रेल्वे देशभर पसरलेल्या जाळ्यासाठी आणि सर्व स्तरातील प्रवाशांना परवडेल अशा प्रवासासाठीही जगभर ओळखली जाते. भारतासारख्या विस्तीर्ण देशात तर तिचं महत्त्व जास्तच आहे. प्रवाशांच्या सोयीसुविधांचा काळजीपूर्वक विचार करण्यातून रेल्वे फक्त सोयीचीच नाही तर जिव्हाळ्याचीही ठरते. हा जिव्हाळा कायम राखण्यासाठी रेल्वेही सदैव प्रयत्नशील असते. रेल्वेच्या ‘जागृती यात्रा’ या योजनेमुळे प्रवासी संपूर्ण भारतभर प्रवास करु शकतात. ही योजना काय आहे जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

जागृती यात्रेद्वारे 500 तरुण तरुणींना भारत दर्शन घडवलं जातं. ही एक वार्षिक सहल आहे. 15 दिवसांच्या या यात्रेत 8000 किलोमीटरचा प्रवास घडतो. आणि 15 शहरांना भेटी देता येतात. या यात्रेदरम्यान देशातील यशस्वी उपक्रम, व्यक्ती यांना भेटी देण्याची संधी तरुण-तरुणींना मिळते.  ही यात्रा देशाची राजधानी नवी दिल्लीतून सुरु होते. तिचा पहिला स्टॉप अहमदाबाद आहे. त्यानंतर मुंबई, बेंगळुरू, मदुराई, विशाखापट्टणम आणि परत नवी दिल्ली असा प्रवास करत ती यात्रा संपते. या प्रवासात अनेक तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळांना भेटी देता येतात. यात्रेत सहभागी प्रवासी आपल्या इच्छेप्रमाणे ही ठिकाणं पाहू शकतात.

advertisement

जागृती यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रवाशाचं वय 21 ते 27 वर्ष असणं आवश्यक आहे. या वर्षी 16 नोव्हेंबर ते एक डिसेंबर या काळात ही यात्रा होणार आहे. यात्रेत सहभागी होण्यासाठी इच्छुक https://www.jagritiyatra.com/ या लिंक वर अर्ज करु शकतात. त्यानंतर काही महत्त्वाचे निकष लावून यात्रेसाठी प्रवासी निवडले जातात. या यात्रेसाठी अवघ्या 25 रुपयांचं तिकिट आहे.

advertisement

प्रवास आपलं अनुभवविश्व समृद्ध करतो असं म्हटलं जातं. 15 दिवसांत देशभर सुमारे 8000 किलोमीटरचा प्रवास, विविध ठिकाणांना भेटी देण्याची संधी आणि या प्रवासात देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुण-तरुणींशी संवाद साधण्याची संधी हा 21 ते 27 वर्ष वयाच्या तरुणांसाठी एक भन्नाट अनुभव ठरु शकतो, यात शंकाच नाही. प्रवासाची आवड, आपला देश समजून घेण्याचं कुतूहल असलेल्या तरुण तरुणींनी या यात्रेत सहभाग घ्यायला हरकत नाही.

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
15 दिवस, 8000km, 25 रुपये तिकिट, वर्षातून एकदाच धावणाऱ्या ट्रेनची जर्नी बदलेल 'आयुष्याचा प्रवास'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल