एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये 490 ज्युनिअर एक्झिक्युटिव्हच्या पदांवर भरती करण्यात येणार आहे. ही भरती GATE 2024 च्या गुणांच्या आधारे केली जाईल. एएआयच्या भरतीसाठी अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू झाली आहे आणि ती 1 मे रोजी संपेल.
एएआयमध्ये या पदांवर होईल भरती :
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी – स्थापत्य) : 90 जागा
advertisement
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी – इलेक्ट्रिकल) : 106 जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) : 278 जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (आर्किटेक्चर) : 03 जागा
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान) : 13 जागा
एकूण जागा : 490
एएआयमध्ये नोकरीसाठी आवश्यक वयोमर्यादा
या पदांवर होणाऱ्या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल, त्यांचं वय जास्तीत जास्त 27 वर्षं असावं. 1 मे पासून वयोमर्यादेची गणना केली जाईल. तसंच सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलतही मिळू शकेल.
एएआयमध्ये अर्ज भरण्यासाठी लागणारी पात्रता
एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी – बांधकाम) : उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातला पदवीधर असावा.
एक्झिक्युटिव्ह (अभियांत्रिकी – इलेक्ट्रिकल) : उमेदवार हा इलेक्ट्रिकल विषयातला अभियांत्रिकी पदवीधर असला पाहिजे.
एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकलमध्ये स्पेशालिस्ट असावा.
एक्झिक्युटिव्ह (वास्तुविशारद) : उमेदवाराजवळ वास्तुविशारद पदवी असावी. तसंच आर्किटेक्ट कौन्सिलबरोबर नोंदणीकृत असणं आवश्यक आहे.
एक्झिक्युटिव्ह (कॉम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान) : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कॉम्प्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान विषयातली पदवी असावी.
एएआयमध्ये निवड झाल्यानंतर किती मिळेल पगार?
एएआयमध्ये या भरती प्रक्रियेअंतर्गत या पदांसाठी ज्या उमेदवारांची निवड होईल, त्यांना40,000 रुपये आणि 3% वाढीसह 1,40,000 रुपयांपर्यंत वेतन दिलं जाईल.