TRENDING:

Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, निकालात मोठा बदल

Last Updated:

Maharashtra SSC Result 2024 update : यंदा निकालादरम्यान एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिचेकिंगला टाकायचं आहे किंवा आपला उत्तर पत्रिका पाहायची आहे त्यासाठी काही बदल बोर्डनं केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा कोकणने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. तर मुलींच्या निकालाची टक्केवारी राज्यात सर्वाधिक आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन दुपारी 1 वाजता पाहता येणार आहे.
दहावी निकाल
दहावी निकाल
advertisement

यंदा निकालादरम्यान एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिचेकिंगला टाकायचं आहे किंवा आपला उत्तर पत्रिका पाहायची आहे त्यासाठी काही बदल बोर्डनं केले आहेत. जे विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप समजून घेणं महत्त्वाचे आहे.

Maharashtra SSC Result 2024 : दहावीचा निकाल जाहीर, कोकण पुन्हा अव्वल, मुलींची बाजी

advertisement

एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडले असतील किंवा त्याला वाटत असेल की पुन्हा रिचेकिंगला करायचं असेल तर त्यासाठी देखील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना फोटो कॉपी हवी असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 28 तारखेपासून 11 जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत. जवळपास ही 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

advertisement

विद्यार्थ्यांना प्रति विषय 400 रुपये भरुन फोटो कॉपी घेता येणार आहे. दोन विषयाची फोटो कॉपी घेतली तर आणखी काही विषयाची फोटो कॉपी घेत असेल तर ती परवानगी देखील देण्यात येणार आहे. यापूर्वी फोटो कॉपीसाठी एकदाच अर्ज करता येत होता. मात्र आता विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा अर्ज करुन फोटो कॉपी घेण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्याने सहावेळा सहा विषयाची फोटो कॉपी घेतली किंवा एकदाच घेतली तरीही चालणार आहे. बोर्डाने यावर्षीच्या निकालात हा एक बदल केला आहे. अध्यक्ष राज्य मंडळ शरद गोसावी यांनी दिली महत्त्वाची माहिती.

advertisement

विभागनिहाय निकाल

यंदाही मुलींची बाजी - निकालाची टक्केवारी - ९७ २१ %

मुले- निकालाची टक्केवारी - ९४.५६%

कोकण ९९.०१ टक्के विभाग अव्वल

नागपूर विभाग निकाल कमी ९४.७३

७२ विषयांपैकी १८ विषय निकाल १०० टक्के

९३८२ शाळा निकाल १०० टक्के

गेल्या वर्षी पेक्षा १.९८ टक्के निकाल जास्त लागलं

यशस्वी न झालेल्या विद्यार्थ्यांनी ना उमेद होऊ नये - शरद गोसावी अध्यक्ष राज्य मंडळ

advertisement

कुठे पाहता येईल निकाल

तुम्ही ऑनलाईन निकाल पाहू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवरुन जाऊन तिथे माहिती अपडेट करायची आहे. विद्यार्थ्याचे सर्व डिटेल्स भरल्यानंतर निकाल पाहता येणार आहे.

1- mahresult.nic.in

2- mahahsscboard.in

3- results.digilocker.gov.in

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

4- results.gov.in

मराठी बातम्या/करिअर/
Maharashtra SSC Result 2024 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, निकालात मोठा बदल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल