वयोमर्यादा
या भरतीसाठी उमेदवाराची वयोमार्यादा 21 वर्षे ते 30 वर्षे इतकी आहे. ST/SC प्रवर्गातील तरुणांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC प्रवर्गातील तरुणांना 3 वर्षांची सूट मिळेल.
पात्रता काय ?
उमेदवार कोणत्याही विषयाचा पदवीधर असावा. आणि उमेदवाराला तो ज्या राज्यासाठी अर्ज करत आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे. पगार सुरुवातीला सुमारे 40000 रुपये असणार आहे.
advertisement
निवड कशी केली जाणार?
निवड उमेदवारांची निवड प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि प्रादेशिक भाषा चाचणीमधील कामगिरीच्या आधारे केली जाईल. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या शॉर्टलिस्टेड उमेदवारांनाही प्रादेशिक भाषेच्या परीक्षेला बसावे लागेल. पूर्व परीक्षेचे स्वरूप 1 तासाची 100 गुणांची ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी असेल. पेपरमध्ये इंग्रजी (30 गुण, 30 प्रश्न), तर्क (35 प्रश्न, 35 प्रश्न), संख्यात्मक क्षमता 35 प्रश्न, 35 गुण असे तीन विभाग असतील.
महाराष्ट्रात परीक्षा केंद्र कुठे असणार?
अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR,नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी
अर्जाचे शुल्क किती?
अजा/ अज/ दिव्यांग रु 100 तर इतर उमेदवारांसाठी 850 रुपये अर्ज शुल्क असणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी newindia.co.in या वेबसाइटवर जाऊन (Recruitment Section) वर जाऊन अर्ज भरा.
