कोडरमा : असं म्हणतात की व्यक्तीमध्ये शिकण्याची जिद्द असेल तर तो आपली स्वप्न पूर्ण करू शकतो, हे एका 49 वर्षांच्या व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये या व्यक्तीने यश मिळवत सर्वांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे. 49 वर्ष वय असताना कुटुंब आणि करिअर सांभाळत त्यांनी हे यश मिळवले.
advertisement
प्रदीप हिसारिया असे या व्यक्तीचे नाव आहे. ते झुमरी तिलैया येथील रहिवासी आहेत. त्यांच्या या यशानंतर लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, 1993 मध्ये त्यांनी बारावी पास केली. यानंतरच चार्टर्ड अकाउंटंट परिक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत सामान्य असल्याने त्यांना मध्येच या परिक्षेची तयारी सोडावी लागली. यानंतर त्यांनी 2016 मध्ये पुन्हा या परिक्षेची तयारी सुरू केली. पण यावेळीही आणखी एक वेगळे कारण समोर आले.
यावेळी जीएसटी लागू झाल्याने कामाचा व्याप वाढल्याने त्यांना चार्टर्ड अकाउंटंट या परिक्षेची तयारी पुन्हा सोडावी लागली. त्यांचा मुलगा सध्या सीएच्या अंतिम वर्षाला आहे तर मुलगी ही नागरी सेवा परिक्षेची तयारी करत आहे. दरम्यान, एका घटनेने त्यांचं पुन्हा आयुष्यत बदलून गेलं. 2021 मध्ये ते आपल्या मुलाला सीएची तयारी करण्यासाठी ट्रेनने राजस्थानला पाठवत होते.
5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी अन् लाखो रुपये मिळेल सॅलरी; फक्त त्याआधी इथून करावा लागेल हा कोर्स
ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, त्यांनी आपल्या मुलाच्या पुस्तकांकडे लक्ष दिले. पुस्तकं चांगल्या पद्धतीने हाताळल्यावर आपणही पुन्हा सीएची तयारी करावी, अशी इच्छा त्यांच्या मनात जागृत झाली. यानंतर मग त्यांनी आपलं सीए बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या परिक्षेची तयारी सुरू केली.
असं होतं वेळेचं नियोजन -
प्रदीप हिसारिया हे आयकर आणि जीएसटीचे वकील म्हणून कार्यरत आहेत. सकाळी 5 वाजेपासून 9 वाजेपर्यंत ते अभ्यास करायचे. त्यानंतर सकाळी 10 वाजेपासून ते 7 वाजेपर्यंत ते कार्यालयात राहायचे. ऑफिस संपल्यावर पुन्हा सायंकाळी 7.30 वाजेपासून रात्री 10.30 पर्यंत सीएचा अभ्यास कराचये. वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि स्वयं अध्ययन यामुळे मला हे यश मिळाले, असे त्यांनी सांगितले.
बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 30 वर्षांनंतर आपले स्वप्न पूर्ण केले आहे. आपल्या स्वप्नांना आपल्या प्राथमिकतेत बदलणं, हेच यशाचं रहस्य असल्याचं ते म्हणाले. मेहनत आणि दृढ निश्चय असेल तर कुठलंही कार्य कठीण नाही.
