झाशी : सध्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोक आजारी पडत आहेत. बराच वेळ किंवा दीर्घवेळ ऑफिसमध्ये एकाच स्थितीत काम केल्याने अनेकदा लोकांना स्नायूंचा ताण आणि हाडे दुखण्याचा त्रास होतो. या सर्व उपचारांसाठी फिजिओथेरपिस्टची आवश्यकता असते.
फिजिओथेरपी क्षेत्रात तरुणाई चांगले करिअर तयार करू शकते. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सरकारी तसेच खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. बुंदेलखंड विद्यापीठातील फिजियोथेरेपी विभागाचे समन्वयक डॉ. सत्येंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, फिजियोथेरेपी मेडिकलचाच एक भाग आहे. हा कोर्स करणारा विद्यार्थी मुख्यत: शरीराच्या बाहेरच्या भागांचा उपचार करतात. हाडे किंवा स्नायूंच्या दुखापतींवर उपचार करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट काम करतात. स्नायूंवर ताण आणि वेदना बरे करण्यासाठी डॉक्टर औषधासोबत फिजिओथेरपी देखील सांगतात. या अंतर्गत मसाज, व्यायाम किंवा इलेक्ट्रोथेरपीद्वारे रुग्णावर उपचार केले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.
आश्चर्यम...महिलेचं वय 20, एकाच वेळी दिला 5 मुलींना जन्म, अनेकांना विश्वासच बसेना!
बुंदेलखंड विद्यापीठात बॅचलर ऑफ फिजियोथेरेपीचे कोर्स चालवला जातो. यासाठी प्रवेश हा प्रवेश प्ररिक्षेच्या माध्यमातून दिला जातो. विज्ञान शाखेतून बारावी पास करणाऱ्या विद्यार्थी या कोर्ससाठी अर्ज करू शकतो. याठिकाणी एकूण 40 जागांसाठी प्रवेश दिला जातो. साडेचार वर्षांच्या कोर्ससाठी प्रत्येक वर्षासाठी 52 हजार रुपये इतकी फी आहे. प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी हे www.bujhansi.ac.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
लग्नाचे अर्धे विधी पार पडले अन् मध्येच घडलं भयानक कांड, वरानं मंडपंच सोडला, नेमकं काय झालं?
फिजियोथेरेपीनंतर या क्षेत्रात नोकरी -
फिजियोथेरेपीचा कोर्स केल्यानंतर सरकारी रुग्णालय आणि आरोग्य संस्थेत नोकरी करू शकतात. नर्सिंग होम आणि क्लीनिकमध्येही संधी असतात. यासोबतच एखाद्याला क्रीडा दुखापती आणि पुनर्वसन केंद्रांमध्येही नोकरी मिळू शकते. इतकेच नव्हे तर तुम्ही विविध स्पोर्ट्स टीम जसे की टीम इंडिया आणि आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या संघांसाठी फिजिओथेरपिस्ट म्हणूनही काम करू शकता. तसेच पीएचडी केल्यानंतर कॉलेजमध्ये प्राध्यापकाचीही नोकरी करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
