रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कनिष्ठ अभियंता सिव्हिल आणि कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल या पदासाठी ही जागा प्रसिद्ध केली आहे.
पदसंख्या
जूनियर इंजिनीअर सिव्हिल - 7
जूनियर इंजिनीअर इलेक्ट्रिकल - 4
एकूण संख्या - 11
पात्रता काय आहे?
आरबीआयच्या या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ, महाविद्यालय किंवा संस्थेतून किमान 65 टक्के गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे. तर SC/ST उमेदवारांसाठी उत्तीर्णतेची टक्केवारी 55 टक्के निश्चित करण्यात आली आहे. अभियांत्रिकी पदवी धारक उमेदवारांना 55 टक्के गुण असावेत. तर डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना 2 वर्षांचा कामाचा अनुभव आणि पदवीधारकांना 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अधिकृत अधिसूचनेवरून उमेदवार आरबीआय जेई पदाशी संबंधित इतर पात्रता तपासू शकतात.
advertisement
वयोमर्यादा
RBI च्या या भरतीमध्ये सामील होण्यासाठी, उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असावे. वयोमर्यादा 1 डिसेंबर 2024 च्या आधारावर मोजली जाईल.
पगार
निवडलेल्या उमेदवारांचे प्रारंभिक मूळ वेतन प्रति महिना रु. 33,900/- पर्यंत असेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT) द्वारे केली जाईल.
अर्ज शुल्क- या पदासाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना 450 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC/ST/PH उमेदवारांसाठी हे शुल्क 50 रुपये ठेवण्यात आले आहे.
परीक्षेची तारीख
लेखी परीक्षेत इंग्रजीतून 180 प्रश्न विचारले जातील, अभियांत्रिकी विषयाचा पेपर I, अभियांत्रिकी विषयाचा पेपर II, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती. ज्यासाठी उमेदवारांना 150 मिनिटांचा वेळ दिला जाईल. या परीक्षेत 1/4 गुणांचे निगेटिव्ह मार्किंगही ठेवण्यात आले आहे. या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
