TRENDING:

RBI Recruitment 2025 : विना परीक्षा RBI बँकेत नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 50,000 रुपयांपर्यंत पगार, अर्ज कुठे आणि कसा कराल?

Last Updated:

RBI Recruitment 2025 Apply Online : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयने नवीन भरतीची घोषणा केली आहे. वैद्यकीय सल्लागार (एमसी) पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in वर अर्ज देखील सुरू झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आरबीआयने नवीन भरतीची घोषणा केली आहे. वैद्यकीय सल्लागार (एमसी) पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in वर अर्ज देखील सुरू झाले आहेत. ज्यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटची तारीख 14 फेब्रुवारी सायंकाळी 4:40 वाजेपर्यंत फॉर्म अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांचे रिझर्व्ह बँकेत काम करण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी ही नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी असू शकते.
News18
News18
advertisement

पात्रता काय आहे?

आरबीआयमध्ये वैद्यकीय सल्लागाराच्या या नोकरीसाठी, उमेदवारांकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. जनरल मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. याशिवाय, उमेदवारांना वैद्यकीय व्यवसायी म्हणून दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमधून पात्रतेशी संबंधित तपशीलवार माहिती देखील तपासू शकतात.

advertisement

पगार किती मिळणार?

वैद्यकीय सल्लागार पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेद्वारे केली जाईल. म्हणजेच या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. किमान पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. रिझर्व्ह बँकेत ही भरती 3 वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. ज्यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना प्रति तास 1000 रुपये दराने म्हणजेच मासिक पगार दिला जाईल.

advertisement

अर्ज कसा कराल?

आरबीआयच्या या रिक्त पदासाठी, उमेदवारांना अर्ज भरावा लागेल आणि तो विहित पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज फॉर्मची लिंक अधिसूचनेतच आहे. फॉर्म पाठवण्याचा पत्ता "प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोलकाता प्रादेशिक कार्यालय, 15, नेताजी सुभाष रोड, कोलकाता 700001." हा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

दरम्यान, या आरबीआय भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात

advertisement

मराठी बातम्या/करिअर/
RBI Recruitment 2025 : विना परीक्षा RBI बँकेत नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 50,000 रुपयांपर्यंत पगार, अर्ज कुठे आणि कसा कराल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल