TRENDING:

RBI Recruitment 2025 : वैद्यकीय पदवीधारकांना RBI मध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 50,000 ते 1,00,000 रुपये पगार

Last Updated:

RBI Recruitment 2025 : एमबीबीएस पदवी असलेले डॉक्टर्स किंवा पदव्युत्तर पदवी असलेल्या डॉक्टर्सना नोकरीची संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मेडिकल कन्सल्टंट या पदावर भरतीसाठी निवेदन प्रसिद्ध केलं असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्याविषयी अधिक जाणून घेऊ या. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : एमबीबीएस पदवी असलेले डॉक्टर्स किंवा पदव्युत्तर पदवी असलेल्या डॉक्टर्सना नोकरीची संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मेडिकल कन्सल्टंट या पदावर भरतीसाठी निवेदन प्रसिद्ध केलं असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्याविषयी अधिक जाणून घेऊ या.
News18
News18
advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मेडिकल कन्सल्टंट या पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती काँट्रॅक्टवर होणार असून, इच्छुक उमेदवारांनी 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करायचे आहेत. या पदावर अर्ज करण्यासाठी पात्रतेचे काही निकष आहेत. त्यांची माहिती घेऊ या.

शैक्षणीक पात्रता काय?  

पदव्युत्तर पदवी - उमेदवाराकडे जनरल मेडिसिन विषयात पोस्टग्रॅज्युएट डिग्री अर्थात पदव्युत्तर पदवी असली, तरी ते उमेदवार पात्र आहेत. तसेच संबंधित उमेदवाराकडे वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचा दोन वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.

advertisement

अर्ज कसा कराल?

इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरून तो दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अधिकृत वेबसाइटवरून अर्ज मिळवता येईल. त्यात आवश्यक ती सर्व माहिती भरून तो 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचेल अशा बेताने पाठवावा. अर्ज पाठवण्याचा पत्ता - रीजनल डायरेक्टर,ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट डिपार्टमेंट, रिक्रूटमेंट सेक्शन, रिझर्व बँक ऑफ इंडिया, कोलकाता क्षेत्रीय कार्यालय, 15, नेताजी सुभाष रोड, कोलकाता - 700001.

advertisement

निवड प्रक्रिया कशी केली जाणार?

उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. या भरतीसाठी लेखी परीक्षा असणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर उमेदवारांचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. या पदासाठी तीन वर्षांचं काँट्रॅक्ट असेल. निवड झालेल्या उमेदवारांना प्रति तास एक हजार रुपये मानधन मिळेल, असं अधिकृत जाहिरातीत म्हटलं आहे. याचाच अर्थ असा, की एका दिवसात चार तास काम झालं, तर दिवसाला चार हजार रुपये मिळू शकतात. अर्थात, किती तास आणि कधी काम करायचं असेल याबद्दलची माहिती अधिकृत वेबसाइटवरच मिळेल. त्यावरून पगाराचा अंदाज बांधता येईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

तसंच या भरतीविषयीची सारी माहिती अधिक विस्ताराने रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे. ती पाहून इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

मराठी बातम्या/करिअर/
RBI Recruitment 2025 : वैद्यकीय पदवीधारकांना RBI मध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळणार 50,000 ते 1,00,000 रुपये पगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल