या रेल्वे भरतीमध्ये अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच, या रेल्वे भरतीत सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी सुमारे 1 महिन्याचा कालावधी आहे. रेल्वे ग्रुप डी फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे आपण जाणून घेऊ?
आवश्यक कागदपत्रे कोणती?
रेल्वे ग्रुप डी ची ही भरती विविध झोनसाठी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांना दहावीच्या गुणपत्रकासोबत खालील कागदपत्रे महत्वाचे आहेत.
advertisement
आधार कार्ड
पासपोर्ट आकाराचा फोटो
स्वाक्षरी
ईमेल आयडी
उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचा)
ओबीसी-एनसीएल प्रमाणपत्र
ACVT/NCVT प्रमाणपत्र
ट्रान्सजेंडर उमेदवारांचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
घटस्फोट/न्यायिक विभक्तता (लागू असल्यास)
नॉन क्रिमी लेयर घोषणा
पीडब्ल्यूडीचे वैद्यकीय प्रमाणपत्र
जम्मू आणि काश्मीर अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
वयाची अट काय?
रेल्वेने या भरतीत सामील होण्यासाठी उमेदवारांच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर, किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 36 वर्षे आहे. वयोमर्यादा 1 जानेवारी 2025 च्या आधारावर मोजली जाईल. राखीव प्रवर्गासाठी वयात सूट देण्यात आली आहे. आरआरबीने अधिसूचनेत रेल्वे ग्रुप डी पात्रता तपशीलवार दिली आहे.
या रेल्वे भरतीमध्ये उमेदवारांची निवड सीबीटी परीक्षा, पीईटी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीवर आधारित असेल. भरतीशी संबंधित इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
