अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत होती. मात्र, आता ही मुदत 10 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जेणेकरून उमेदवारांना अतिरिक्त वेळ मिळू शकेल. इच्छुक उमेदवार 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.
पात्रता आणि अनुभव: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातील बीएमओ या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या कोणत्याही युनिव्हर्सिटीतील 'ॲलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन'ची किमान एमबीबीएस पदवी असणं गरजेचं आहे. उमेदवाराने कोणत्याही हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये किमान दोन वर्षे मेडिकल प्रॅक्टिस केलेली असावी.
advertisement
निवड प्रक्रिया: बीएमओपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना लेखी परिक्षा द्यावी लागणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. मुलाखतीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी किमान पात्रता निकष वाढवण्याचा अधिकार बँकेकडे आहे. याबाबत बँकेचा निर्णय अंतिम असेल. पात्रता निकषांची पूर्तता केलेल्या सर्वच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता कमी आहे. बँक फक्त मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांशी पत्रव्यवहार करेल.
आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, अंतिम मुदतीत अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांचाच मुलाखतीसाठी विचार केला जाईल. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रं जोडावीत.
माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, आरबीआयप्रमाणे इतर बँकांमध्ये देखील मेडिकल ऑफिसर असतो. बँकेच्या ग्राहकांना वैद्यकीय सल्ला देणं हे, या वैद्यकीय अधिकाऱ्याचं काम असतं. वैद्यकीय अधिकारी ग्राहकांना आरोग्यविषयक सल्ला देतात आणि त्यांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला देतात.
