शिक्षकांच्या मूल्यमापन क्षमतेचे मूल्यांकन करणारी, शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली अध्यापनक्षमता व बुद्धिमत्ता चाचणी ( TAIT) परीक्षेचा निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहे. या निकालामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला जाणार आहे. या उमेदवारांच्या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. निकालाची घोषणा झाल्यावर पात्र ठरणाऱ्या 10 हजार 757 उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी संधी मिळेल.
advertisement
परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (website) जाहीर केला जाईल. उमेदवारांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी www.mscepune.in या लिंकवर या. तिथे डाव्या कोपऱ्यात निकालाचे अपडेट दिसतील तिथे जाऊन क्लिक करा. तिथे आपला रजिस्ट्रेशन नंबर अपलोड करा. निकालावेळी सगळे एकदम पाहात असल्याने लोड येऊ शकतो. त्यामुळे निकाल पाहण्यासाठी वेबसाईटला वारंवार भेट देत राहा आणि अपडेट मिळवत राहा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
'टेट' परीक्षा ही शिक्षकाची योग्यता तपासण्यासाठी घेतली जाते. यातून उमेदवारांची आकलनशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि शिकवण्याची पद्धत अशा अनेक गुणांची तपासणी केली जाते. चांगल्या शिक्षकांची निवड झाल्यास त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होतो, हे लक्षात घेऊन ही परीक्षा घेतली जाते. मे आणि जून अखेर झालेल्या या परीक्षाला मोठ्या प्रमाणात उमेदवार उपस्थित होते. या परीक्षेचा निकाल आज लागणार आहे.
ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता, त्याचवेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्रक व्यावसायिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याच्या तारखेपासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयात सादर केलं नाही अशा बी. एड. परीक्षेच्या पाच हजार आठशे चार आणि डीएलएड परीक्षेच्या 515 अशा एकूण 6 हजार 319 अपियर उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यांचा निकाल आज दिला जाणार नाही.