लातूरमध्ये शालेय शिक्षण
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले आयएएस विशाल नरवडे यांचे शालेय शिक्षण लातूरमध्येच झाले. त्यानंतर त्यांनी जबलपूर आयआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बीटेक केले. बीटेक करीत असतानाच त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला होता. आयएएस अधिकारी बनून देशाची सेवा करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं, परंतु हे स्वप्न पूर्ण करणे सोपे नव्हते.
advertisement
पाचवेळा दिली यूपीएससी परीक्षा
आयएएस पदापर्यंत पोहोचण्यासाठी विशाल नरवडे यांना खूप कष्ट करावे लागले. त्यांनी एक-दोन नव्हे तर सलग पाचवेळा यूपीएससी परीक्षा दिली. प्रथम ते 2016 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस झाले. त्यानंतर पुन्हा 2019 मध्ये ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले, व देशात 91 वी रँक मिळवत आयएएस झाले. आयएएस विशाल नरवडे हे यूपीएससीची तयारी करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत, जे पहिल्या किंवा दुसऱ्या अपयशानंतर नैराश्यात जाऊन यूपीएससीची तयारी करणं सोडून देतात.
काय आहे यशाची स्ट्रॅटेजी?
आयएएस विशाल नरवडे हे स्वतःच्या यशाच्या स्ट्रॅटेजीबद्दल सांगतात की, ‘वेटेजनुसार विषयाला महत्त्व द्या. यूपीएससीचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. त्यामुळे हा संपूर्ण अभ्यास कव्हर करण्याचा प्रयत्न केला, तर तो वेळेत पूर्ण होणार नाही. त्यामुळे परीक्षेत ज्या विषयांचे जास्त प्रश्न विचारले जातात, त्यांना अधिक महत्त्व द्या. यामुळे तुमचा वेळ वाचेल, व तयारीलाही मदत होईल. अभ्यासाच्या या टेक्निकने प्रीलिम्स उत्तीर्ण होता येऊ शकते.’
स्वतःची तुलना इतरांशी नको
विशाल नरवडे यांनी यूपीएससीची तयारी करणाऱ्यांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. ते म्हणतात, ‘परीक्षेची तयारी करताना स्वतःची तुलना इतर कोणाशीही करू नका. कारण प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. अभ्यासाची पद्धतही वेगळी असते. अशा परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे मर्यादित साधनं असली तरी त्यासह योग्य दिशेनं काम करीत राहा. या शिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे अभ्यासाचे स्रोत वारंवार बदलू नका. वेळोवेळी पुस्तके बदलली तर तयारी शक्य होणार नाही.’
रिव्हिजन महत्त्वाची
विशाल नरवडे यूपीएससीच्या तयारीमध्ये रिव्हिजन अत्यंत महत्त्वाची मानतात. परीक्षेची तयारी करताना शक्य तितकी रिव्हिजन करा, असे ते सांगतात. परीक्षेला व्यवस्थित व सकारात्मक विचारानं सामोरं जा. परीक्षेचा ताण घेतला तर नुकसानच होईल. कष्टाच्या जोरावर यश नक्कीच मिळेल.
