भागलपुर : भारतीय शिक्षकाचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. बिहार राज्यातील भागलपूर येथील शिक्षक सत्यम मिश्रा यांना तब्बल 42 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. जगातील अत्यंत प्रतिष्ठित अशा अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाकडून त्यांना ही स्कॉलरशिप शिष्यवृत्ती मिळाली आहे. तेथे ते “शिक्षण आणि शिक्षक नेतृत्व (teaching and teacher leadership)” या विषयात ते पदव्युत्तर शिक्षण घेतील.
advertisement
शिक्षक सत्यम मिश्रा हे विशेष पद्धतीने गणित विषय शिकवण्यात तज्ञ मानले जातात. ते बिहारच्या भागलपूरच्या भीखनपूर येथील रहिवासी आहेत. येथील खेळाडू, अभिनेत्री, तसेच अनेक शिक्षक आज भागलपूरचे नाव मोठे करत आहेत. यातच आता शिक्षक सत्यम मिश्रा यांनीही स्थान मिळवले आहे.
फुलब्राइट डिस्टिंग्विश्ड पुरस्काराने सन्मानित -
सत्यमने 18 देशांमध्ये मुलांना शिकवले आहे. त्यांना अध्यापनातील ग्लोबल टीचर अवॉर्ड आणि फुलब्राइट डिस्टिंग्विश्ड अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे. टीच फॉर ऑल या संस्थेच्या माध्यमातून कार्य करत असताना ते 18 देशांतील मुलांना शिकवतात आणि शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या वापराचे महत्त्वही स्पष्ट करतात.
कुणाला नोकरी गमावण्याची भिती, तर कुणाला आणखी कसला त्रास, मानसिक तणावामुळे अनेक जण त्रस्त
काय म्हणाले सत्यम मिश्रा -
सत्यम मिश्रा यांनी सांगितले की, 42 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मला मिळाली आहे. ही स्कॉलरशिप सहसा कुणालाही मिळत नाही. त्यामुळे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. मला वाटते की, मुलांनी नेहमी शिकत राहावं आणि मी त्यांना शिकवत राहू. हार्वर्डमधून परत आल्यानंतर मला बिहारमध्येच काम करायचे आहे. येथील मुलांनाच मला शिकवायचे आहे.
मी तिथून जे शिकेन, ते कट आणि कॉपी पेस्ट न करता बिहारच्या सभ्यतेनुसार आणि संस्कृतीनुसार त्यात बदल करेन आणि इथल्या शिक्षकांना प्रशिक्षण देईन आणि मुलांनाही शिकवेन. हेच माझे स्वप्न आहे, असे ते म्हणाले.
