कुणाला नोकरी गमावण्याची भिती, तर कुणाला आणखी कसला त्रास, मानसिक तणावामुळे अनेक जण त्रस्त

Last Updated:

यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांचा तसेच गृहिणींचाही समावेश आहे. कुणाला फोबियाने तर काहींना नैराश्याने ग्रासले आहे. वारंवार हात धुणे चुकीचे आहे का? मी वेडा आहे का? आनंदी राहणे हा वेडेपणा आहे का?, असे वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो
दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी
नर्मदापुरम : सध्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना तणावाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ती म्हणजे मागील दोन महिन्यांपासून मध्यप्रदेशच्या नर्मदापूरम जिल्हा रुग्णालयाच्या मन कक्षात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयाची आकडेवारी याची साक्ष देत आहे.
यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांचा तसेच गृहिणींचाही मोठा आहे. कुणाला फोबियाने तर काहींना नैराश्याने ग्रासले आहे. वारंवार हात धुणे चुकीचे आहे का? मी वेडा आहे का? आनंदी राहणे हा वेडेपणा आहे का?, असे वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. याठिकाणी तैनात असलेले डॉक्टर दररोज या प्रश्नांचा सामना करत आहेत.
advertisement
मागील दोन महिन्यांपासून 801 रुग्ण मन कक्षात उपचारासाठी आले आहेत. यामध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. सजुन सिंग सेंगर यांनी लोकल 18 ला याबाबत माहिती देताना सांगितले की, लोक मन कक्षात उपचारासाठी येत आहेत. आरोग्याबाबत लोक पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झाले आहेत. लोकांचा संकोच दूर झाला आहे. जानेवारीमध्ये 340 लोक याठिकाणी आले होते. यामध्ये 141 महिला आणि 199 पुरुष होते. फेब्रुवारीमध्ये, 461 लोक आले पोहोचले, यात 203 महिला आणि 258 पुरुष होते.
advertisement
कोणत्या कारणांमुळे बिघडते मानसिक स्थिती -
फोबिया : हा एक प्रकारचा मनोविकार आहे. यामध्ये व्यक्तीला चिंता सतावते. व्यक्ती विशिष्ट वस्तू, परिस्थिती इत्यादींबद्दल घाबरू लागते. या गोष्टींमुळे व्यक्तीमध्ये दहशत किंवा भीती निर्माण होते.
तणाव : नैराश्य किंवा त्रासदायक घटनेमुळे तणाव निर्माण होतो. शोक, नातेसंबंध तुटणे, नोकरी गमावणे, जीवनातील प्रतिकूल परिस्थिती, एकटेपणा यामुळे व्यक्ती तणावाची शिकार बनते.
advertisement
चिंता : ही एक अशी मानसिक आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये जास्त काळजी, अस्वस्थता किंवा भीतीमुळे व्यक्तीला दैनंदिन कामे करण्यात खूप अडचणी येतात. रुग्ण अचानक जास्त घाबरतो. अनेक वेळा अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती इतरांचेही नुकसान करते.
ओसीडी : हा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आहे. एक प्रकारे, एखाद्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचे वेड लागते. याशिवाय अनेक प्रकारची लक्षणे दिसतात जसे की वारंवार हात धुणे, जास्त साफसफाई करणे इत्यादी.
advertisement
रुग्णांनी सांगितला हा त्रास -
लोकल 18 ने हॉउसिंग बोर्ड येथील रहिवासी असलेल्या 40 वर्षांच्या व्यक्तीसोबत संवाद केला. त्यांनी सांगितले की, मी मार्केटिंगची नोकरी करतो. यामध्ये टारगेटचा दबाव असते. तसेच त्यामुळे नोकरी गमावण्याचीही भिती असते. या कारणामुळे अस्वस्थता, डोकेदुखी सोबतच झोप न येणे, अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर एका 45 वर्षांच्या महिलेने सांगितले की, काही दिवसांपासून त्यांना डोकेदुखीचा त्रास होत आहे. याठिकाणी आल्यानंतर उपचार घेतल्यावर मला आता बरे वाटत आहे.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
कुणाला नोकरी गमावण्याची भिती, तर कुणाला आणखी कसला त्रास, मानसिक तणावामुळे अनेक जण त्रस्त
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement