TRENDING:

अंगावर Tattoo असेल तर मिळत नाही सरकारी नोकरी, पण का? कारण आणि पद जाणून घ्या

Last Updated:

भारतात अनेक सरकारी नोकऱ्या आहेत ज्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना टॅटू काढण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत तुम्ही टॅटू काढणार असाल तर ही बातमी नक्की वाचा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपण किती कूल आहोत, यासाठी बहुतांश लोक टॅटू काढतात. तर काही लोक ट्रेंडमध्ये आहे आणि सगळेच काढतात म्हणून एखादा टॅटू आपल्या अंगावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर काढतात. पण तुम्हाला माहित आहे का की सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी टॅटू हा प्रकार नाही.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

तुम्ही ही सरकारी नोकरीचा विचार करत असाल आणि तूम्हा टॅटू काढायचा असेल तर तुम्हाला दोन्हीपैकी एकाची निवड करावी लागेल. कारण शरीरावर कुठेही टॅटू असेल तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकणार नाही.

भारतात अनेक सरकारी नोकऱ्या आहेत ज्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना टॅटू काढण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत तुम्ही टॅटू काढणार असाल तर ही बातमी नक्की वाचा.

advertisement

अनेक वेळा उमेदवार शारीरिक चाचणीपर्यंत पोहोचतो, परंतु केवळ टॅटूमुळे नाकारला जातो. खरं तर, टॅटूच्या आकाराला मर्यादा नाही. तुमच्या शरीरावर एकही टॅटू आढळल्यास शारीरिक चाचणीच्या वेळीही तुम्हाला सरकारी नोकरीतून नाकारले जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला हे जाणून घेणं महत्वाचं आहे की अशा कोणत्या नोकरी आहेत ज्या टॅटू काढणाऱ्यांना मिळत नाहीत.

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS - Indian Administrative Service)

advertisement

भारतीय पोलीस सेवा (IPS - Indian Police Service)

भारतीय महसूल सेवा (IRS - Internal Revenue Service)

भारतीय विदेश सेवा (IFS - Indian Foreign Service)

भारतीय सैन्य (Indian Army)

भारतीय नौदल (Indian Navy)

भारतीय हवाई दल (Indian Air Force)

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)

पोलीस (Police)

आता प्रश्न असा की टॅटू काढणाऱ्यांना नोकऱ्या का मिळत नाहीत?

advertisement

शरीरावर टॅटू असल्यामुळे सरकारी नोकरी न देण्यामागे तीन मुख्य कारणे आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे टॅटूमुळे अनेक आजार होऊ शकतात. यामुळे एचआयव्ही, त्वचा रोग आणि हिपॅटायटीस ए आणि बी सारखे घातक रोग होऊ शकतात.

याशिवाय असे मानले जाते की ज्या व्यक्तीला टॅटू गोंदवायचे असते, तो व्यक्ती शिस्तबद्ध पद्धतीने काम करू शकणार नाही, कारण कामापेक्षा त्याचे छंद त्याच्यासाठी महत्त्वाचे असतील.

advertisement

तिसरे आणि सर्वात मोठे कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. टॅटू असलेल्या व्यक्तीला कधीही सुरक्षा दलात नोकरी दिली जात नाही. किंबहुना, पकडले गेल्यास टॅटूवरून सहज ओळखता येते. अशा प्रकारे, शरीरावर टॅटू सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक मोठा धोका आहे.

मराठी बातम्या/करिअर/
अंगावर Tattoo असेल तर मिळत नाही सरकारी नोकरी, पण का? कारण आणि पद जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल