पलवल : एकीकडे शिक्षणाच्या नावाने गडेगंज संपत्ती जमवणारे संस्थाचालक दिसतात. मात्र, तेच दुसरीकडे काही लोकं असे आहेत, जे आजही निस्वार्थ भावनेने विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. आज अशाच एका अवलियाबाबत आपण जाणून घेऊयात, जे शेकडो विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देत आहेत.
मंजूर अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे. शिक्षणामुळे एक व्यक्ती एका दिवसाची नव्हे तर आयुष्यभर चांगलं आयुष्य जगू शकतो. इतकेच नव्हे तर येणारी पिढीही सुधारू शकतो. म्हणून शिक्षणाची ही मोहीम पुढे सुरू ठेवण्यासाठी जिंदगी की खुशियां या फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांचे वर्ग सुरू करण्यात आले. या शाळेत फूटपाथवर भीक मागणाऱ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना वही, पेन, पेन्सिल आदी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
advertisement
ही मोहीम मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. युथ स्काउट्स अँड गाईड्सचे सहसचिव आणि योग प्रशिक्षक असलेले मंजूर अहमद याठिकाणी या मुलांना मोफत शिकवत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल राज्यपाल आणि शिक्षणमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला आहे.
400 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना देतायेत शिक्षण -
मंजूर अहमद यांनी आठवी वर्गापासून या दिशेने कार्य करायला सुरुवात केली. परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये लहान मुलांना शिकवण्याचा विचार त्यांनी केला. याबाबत त्यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, सुरुवातीच्या दिवसात ते त्यांच्या अभ्यासाला आणि खेळात भाग घेतल्याने जास्त वेळ देऊ शकत नव्हते. मात्र, 2017 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर मंजूर यांनी या मुलांना नियमित शिक्षण देण्यास सुरुवात केली.
inspiring story : टेलरच्या मुलाचा परदेशात डंका, 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक
आधी त्यांच्याजवळ फक्त 8 मुले होती. मात्र, आता त्यांच्याजवळ 250 मुले शिक्षण घेतात. आता फक्त हुड्डा सेक्टर दोनच नाही तर सोहना रोडवरील झोपडपट्टी आणि मठेपूर गावातही वर्ग चालवले जात आहेत. त्यांनी अनेक मुलांना सरकारी शाळेतही दाखल केले आहे. सुमारे 3 वर्षांपूर्वी, जेव्हा ते स्वतः 11वीचे विद्यार्थी होते, तेव्हा जोगी त्यांच्या अभ्यासाच्या आवडीने झोपडपट्टी भागातील मुलांना शिकवण्यासाठी आले.
मंजूर अहमद या प्रकल्पात इतके रमून गेले आहेत की आज त्यांच्या माध्यमातून चार ठिकाणी मोफत शिकवणी केंद्रे सुरू आहेत. यात आता 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी हे शालेय शिक्षणात परिपूर्ण असतात. मात्र, यासोबतच ते गायन, वाद्य, कला आणि हस्तकलेचे कौशल्यही आत्मसात करतात. विविध प्रकारचे मिथक मोडीत काढत त्यांनी योगामध्ये राज्यस्तरापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
2017 मध्ये, मंजूर अहमद यांनी जेदीपुरा परिसराजवळील दलित कॉलनीतील मुलांना रस्त्याच्या कडेला शिकवायला सुरुवात केली. ते स्वतः संसाधनांशी झगडत होते. त्या दरम्यान, ते एका खासगी शाळेत बारावीत शिक्षण घेत होते.
मंजूर यांनी ब्लॅक बोर्ड आणि इतर काही साधने जमा करुन रस्त्याच्या शेजारी असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरू केले होते. शाळेत जाणारी मुले त्यांच्या वर्गात येऊ लागली. ज्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली नव्हती, अशा मुलांनाही त्यांनी शिक्षणाकडे नेले. आता 3 वर्षांनी 400 पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्याकडे फ्रीमध्ये शिकवणी घेत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना इतर 4 तरुणांचेही सहकार्य लाभत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचेही त्यांना पूर्ण सहकार्य मिळत आहे, असे ते म्हणाले.
