inspiring story : टेलरच्या मुलाचा परदेशात डंका, 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
नेपाळमधील काठमांडू शहरात 8 मार्च ते 11 मार्च 2024 या कालावधीत ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. यामध्ये सचिनने सुवर्णपदक जिंकून राज्याचे आणि जिल्ह्याचे नाव लौकिक केले.
जितेन्द्र बेनीवाल, प्रतिनिधी
फरीदाबाद : आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील मुलेही आपल्या मेहनतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत आहेत. एका मुलाने आपल्या कामगिरीतून पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे. सैनिक पब्लिक सीनियर सेकंडरी स्कूलचा इयत्ता 11वी सायन्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने नेपाळमधील काठमांडू येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
नेपाळमधील काठमांडू शहरात 8 मार्च ते 11 मार्च 2024 या कालावधीत ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. यामध्ये सचिनने सुवर्णपदक जिंकून राज्याचे आणि जिल्ह्याचे नाव लौकिक केले. सचिन हा बल्लभगडच्या उंचा गावात असलेल्या सुभेदार कॉलनीतील रहिवासी आहे. त्याने इंडो-नेपाळ ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील 100 मीटर स्पर्धेत भाग घेतला होता.
advertisement
सचिन याने सांगितले की, 8 मार्च ते 11 मार्च 2024 दरम्यान झालेल्या इंडो नेपाळ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 100 मीटर शर्यतीत मी सुवर्णपदक जिंकले. आज शाळेत पोहोचल्यावर शाळेच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला. शाळेकडून मला खूप सहकार्य मिळाले. मी सैनिक पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता 11वी सायन्सचा विद्यार्थी आहे.
दुसऱ्या वर्गातील शिक्षिकाही उपस्थित, सुरू होती सामूहिक कॉपी, तरुण लिहित होता फळ्यावर उत्तरे…
तो म्हणाला, माझे वडील टेलरकाम करतात. आमची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत आहे. मात्र, माझ्या वडिलांनी कधीही कोणतीही कसर सोडली नाही आणि मला पूर्ण पाठिंबा दिला. त्याने त्याच्या विजयाचे श्रेय कुटुंब, शाळा आणि प्रशिक्षकांना दिले. त्यांच्यामुळे हे सुवर्णपदक जिंकू शकलो. सध्या मला माझा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि आगामी आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताचा गौरव करायचा आहे, हे माझे ध्येय आहे, असेही तो म्हणाला.
advertisement
शाळेच्या मुख्याध्यापिका रेणु आर्या यांनी सांगितले की, सचिन एक चांगला मुलगा आहे. अभ्यासासोबतच त्याला खेळातही रस आहे. त्याने नेपाळमध्ये आयोजित स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर मी त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करते, असे त्या म्हणाल्या. तर त्याचे प्रशिक्षक दीपक यांनी सांगितले की, सचिन मेहनती खेळाडू आहे. 13 वर्षाचा असतानापासून तो मेहनत करत आहेत. त्याने आज आपल्या शाळेचे आणि जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे.
view commentsLocation :
Faridabad,Haryana
First Published :
March 17, 2024 10:16 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
inspiring story : टेलरच्या मुलाचा परदेशात डंका, 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक


