एका वेळी एक परीक्षा द्या
अनेकजण वेगवेगळ्या परीक्षांचे अर्ज भरतात, पण वेळेअभावी कोणत्याच परीक्षेची नीट तयारी करू शकत नाहीत. त्यामुळे एकाच परीक्षेवर लक्ष केंद्रित करा आणि तयारी गुणवत्तापूर्ण करा.
वेळेचे योग्य नियोजन करा
ऑफिसला जाण्यापूर्वी थोडा वेळ अभ्यासासाठी द्या. तसेच प्रवासात चालू घडामोडी वाचून अपडेट राहा. संध्याकाळी नोट्स तयार करा आणि रिव्हिजन करा. तसेच वीकेंड हा अभ्यासासाठी राखीव ठेवा.
advertisement
चालू घडामोडींवर लक्ष ठेवा
स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींचे महत्त्व जास्त असते. ऑफिस ब्रेकमध्ये, प्रवासात, फ्री वेळेत न्यूज अपडेट मिळवा. मोबाईलमध्ये नोट्स लिहून ठेवा.आणि वेळोवेळी रिव्हिजन करा.
सुट्टीच्या दिवशी जास्त मेहनत करा
मॉक टेस्ट आणि सराव पेपर्स सोडवा. तसेच समूह चर्चा आणि अभ्यास गटांमध्ये सामील व्हा. वेळ व्यवस्थापन आणि परीक्षेचा नमुना समजून घ्या. सुट्टीचा दिवस संपूर्ण अभ्यासासाठी वापरा.
ऑनलाइन कोचिंग क्लास लावा
फिजिकल क्लासेससाठी वेळ नसेल, तर ऑनलाइन कोचिंगचा पर्याय निवडा. तसेच व्हर्च्युअल मार्गदर्शन आणि टिप्स याचा लाभ घ्या.
