श्रीनगर गढवाल : असं म्हणतात की इच्छाशक्ती असेल आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर व्यक्ती त्याच्या आयुष्यात यश नक्कीच मिळवतो, असे एका तरुणाने करुन दाखवले आहे. दिव्यांशू रावत असे या तरुणाचे नाव आहे. त्याची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे दिव्यांशूने कोणत्याची कोचिंग क्लासेसविना हे यश मिळवले आहे.
advertisement
दिव्यांशु रावत हा तरुण उत्तराखंड राज्यातील श्रीनगर गढवाल येथील रहिवासी आहे. दिव्यांशु रावतने बालपणापासूनच सैन्यदलाच्या वर्दीचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आणि एसएसबीची परीक्षा ऑल इंडिया रँक 78 मिळवत पास केली. त्याच्या या यशानंतर त्याचे आई-वडील तसेच शिक्षक खूपच आनंदी आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असून प्रत्येकजण त्याचे अभिनंदन करत आहेत.
टेक्निकल ऑफिसर एंट्रीच्या माध्यमातून दिव्यांशुने एसएसबी क्लिअर केली. मुलाखतीसह शारीरिक चाचणीही त्याने पास केली. आता दिव्यांशु चार वर्षांची सखोल आणि कठोर प्रशिक्षण घेणार आहे. यानंतर भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट म्हणून तो सेवा बजावेल.
आश्चर्यम…महिलेचं वय 20, एकाच वेळी दिला 5 मुलींना जन्म, अनेकांना विश्वासच बसेना!
दिव्यांशु ने रेनबो पब्लिक स्कूल श्रीनगर गढवाल येथून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर दिल्ली विद्यापीठात बीए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. सध्या तो बीएच्या द्वितीय वर्षाला आहे. दिव्यांशूने सांगितले की, त्याने एसएसबीची तयारी करण्यासाठी कोणत्याही कोचिंग किंवा ट्यूशनची मदत घेतली नाही. फक्त कोचिंग करणाराच यशस्वी होतो, असे नाही. जर तुमच्यामध्ये दृढ संकल्प असेल आणि स्वयंशिस्त असेल तर यश नक्कीच मिळते.
लग्नाचे अर्धे विधी पार पडले अन् मध्येच घडलं भयानक कांड, वरानं मंडपंच सोडला, नेमकं काय झालं?
भावाकडून मिळाली प्रेरणा
दिव्यांशुने सांगितले की, त्याला त्याच्या मोठ्या भावाकडून ही प्रेरणा मिळाली. त्याच्या भावाने एनडीएची परीक्षा पास करुन सध्या तो सैन्यदलात अधिकारी पदावर कार्यरत आहे. दिव्यांशू याचे वडील शिक्षक आहे. मुलांच्या या यशानंतर त्यांना मोठा आनंद होत आहे. तर दिव्यांशू हा शाळेपासूनच खूप सक्रिय विद्यार्थी होता. बारावीत त्याला 90 टक्के गुण होते. तसेच सोबतच त्याने बारावीच्या वर्गात 90 टक्के गुणही मिळवले होते. सोबतच तो शाळेत स्पोर्ट्समध्ये कॅप्टनही होता, अशी माहिती त्याचे शिक्षक ऋदेश उनियाल यांनी दिली.