चूरू : अनेकांना असे वाटते की लग्नानंतर करिअर करणे शक्य नसते. मात्र, योग्य नियोजन, जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर सातत्याने मेहनत केली तर व्यक्ती आयुष्यात निश्चितच यश मिळवू शकतो, हे एका विवाहित महिलेने सिद्ध केले आहे. आधी ही महिला डॉक्टर बनली. नंतर त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांना 2 मुले झाली. यानंतरही त्यांनी कठोर परिश्रम केले आणि आज ही महिला न्यायाधीश झाल्या आहेत. जाणून घेऊयात, त्यांची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
परमा चौधरी असे त्यांचे नाव आहे. परमा चौधरी या न्यायाधीश पदाच्या परिक्षेत पास झाल्या आहेत. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळवले आहे आणि राज्यात तिसरा क्रमांक मिळवला. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय आपले कुटुंबीय आणि आपल्या कठोर मेहनतीला दिले आहे. त्यांच्या या यशानंतर लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी विशेष संवाद साधला.
राजस्थान न्यायिक सेवा परीक्षा (RJS) चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये परमा चौधरी यांनी बाजी मारत यश मिळवले आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात 187 गुण मिळवत हे यश मिळवत राज्यात तिसरी येण्याचा मान मिळवला. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 2010 मध्ये बीडीएसचे पूर्ण करत त्या डॉक्टर बनल्या. त्यानंतर 2012 मध्ये चुरू येथील सुमित लांबा यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. यानंतर त्यांनी 2 मुलांना जन्मही दिला.
तुमच्या मुलांनाही Anhedonia हा आजार तर नाही, पालकांसाठी महत्त्वाची बातमी!
2020 मध्ये लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यानंतर मग कुठल्याही कोचिंगविना त्या कॉलेजमध्ये टॉपर राहिल्या. 4 वर्षांच्या मेहनतीनंतर परमा यांनी राजस्थान न्यायिक परिक्षेत यश मिळवत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सासरच्या लोकांनी दिली खंबीर साथ -
लग्नाआधी त्यांनी न्यायाधीश बनण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, लग्नानंतर त्यांनी त्यांचे पती सुमित यांच्यासोबत प्रॅक्टिस सुरू केली. दरम्यान, त्यांना त्यांच्या सासरच्या कुटुंबीयांची खंबीर साथ मिळाली. त्यानंतर त्यांनी राज्यात तिसरा क्रमांक मिळवत न्यायाधीश पदावर पोहोचत यश मिळवले. दृढ संकल्प, कुटुंबीयांचे सहकार्य आणि कठोर मेहनतीच्या बळावर हे यश मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
