यामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना प्रति तास आकर्षक मानधन मिळेल आणि काही निवडक उमेदवारांना प्रवास भत्त्याचाही लाभ मिळू शकतो. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया समजून घेणे महत्त्वाचे आहे.
कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या काय?
या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. यामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे:
advertisement
अर्थशास्त्र आणि वित्त (Economics and Finance)
मानवी विकास (Public Health, Education, Nutrition, Population)
कृषी आणि पर्यावरण (Agriculture & Environment)
अभियांत्रिकी आणि शहरी नियोजन (Engineering & Urban Planning)
नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन (Natural Resource Management)
खाजगी क्षेत्र विकास आणि कॉर्पोरेट सपोर्ट (Private Sector Development & Corporate Support)
शैक्षणिक पात्रता काय?
उमेदवार पदवीधर असावा किंवा कोणत्याही नियमित पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा.
भाषा कौशल्ये काय?
इंग्रजी भाषा अवगत असणे आवश्यक आहे. तसेच फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरबी, पोर्तुगीज आणि चिनी भाषांबद्दल मूलभूत ज्ञान असेल तर अधिक चांगले.
तांत्रिक कौशल्ये काय?
संगणकीय आणि तांत्रिक कौशल्ये असणे आवश्यक आहे.
मानधन आणि भत्ते
इंटर्नशिपसाठी प्रति तास आकर्षक स्टायपेंड मिळेल. काही उमेदवारांना $3,000 (अंदाजे 2,60,590 रु) पर्यंत प्रवास खर्चासाठी सहाय्य मिळू शकते. तसेच उमेदवारांनी स्वतःच्या राहण्याची जबाबदारी घ्यावी लागेल.
निवड प्रक्रिया कशी केली जाते?
मार्च 2025 अखेर निवडलेल्या उमेदवारांना सूचना दिली जाईल. उमेदवारांना मुलाखत द्यावी लागेल. तसेच अंतिम निवड एप्रिल 2025 मध्ये होईल. सदर इंटर्नशिपचा कालावधी मे 2025 ते ऑगस्ट 2025 दरम्यान असेल.
अर्ज कसा करावा?
1) अधिकृत वेबसाइट www.worldbank.org वर भेट द्या.
2) आवश्यक कागदपत्रे (बायोडेटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे इत्यादी) अपलोड करा.
3) अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, उमेदवारांना अधिकृत ईमेल प्राप्त होईल.
दरम्यान, ही इंटर्नशिप केवळ एका जागतिक संस्थेसोबत काम करण्याची संधी देत नाही, तर व्यावसायिक अनुभव मिळवून तुमच्या करिअरला नवीन दिशा देऊ शकते.
