इंदूर : अनेक जण इंजीनिअरींगचे शिक्षण घेतात. मात्र, करिअर नंतर वेगळ्याच क्षेत्रात करतात. अशी भरपूर उदाहरणे तुम्हीही पाहिली असतील. आज आम्ही तुम्हाला अशीच एक अत्यंत प्रेरणादायी कहाणी सांगणार आहोत. एका तरुणाने त्यांच्या जंगल प्रेमासाठी तब्बल 30 लाखांची नोकरी सोडली. यूपीएससीमध्ये 3 वेळा अपयशी झाला. मात्र, आता त्याला भारतीय वनसेवेच्या परीक्षेत यश मिळाले आहे आणि त्याने तब्बल 60 वी रँक मिळवली आहे. जाणून घेऊयात, या तरुणाच्या जिद्दीची कहाणी.
advertisement
अमन गुप्ता असे या तरुणाचे नाव आहे. त्यांनी यूपीएसीमध्ये भारतीय वनसेवेची परीक्षा पास करत देशात 60 वी रँक मिळवली आहे. त्याच्या या यशानंतर लोकल18 च्या टीमने त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने सांगितले की, त्याचे वडील ओपी गुप्ता हे सहकार विभागात उपायुक्त आहेत. तर आई अर्चना गुप्ता गृहिणी आहेत. तसेच भावाने आयआयटीमध्ये शिक्षण घेतले असून तो आता एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे.
येणारी तिथी खूपच शुभ, सकाळी वडाची अन् सायंकाळी करा शनिदेवाची पूजा, अद्भुत योगात मिळेल दुपट्ट फळ
अमन याने बिट्स पिलानीमध्ये इंजीनिअरींग केल्यानंतर मेट्रो सिटीत 30 लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरी केली. मात्र, त्याच्या मनात निसर्ग प्रेमाविषयी ओढ होती. त्यामुळे त्याने शेवटी यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला.
त्याने ही परीक्षा सेल्फ स्टडीच्या माध्यमातून पास केली. फक्त काही शंकांचे निरसन करण्यासाठी ऑनलाइन क्लासेसची मदत घेतली. अभ्यासासाठी वेळ नव्हे तर टारगेट ठरवले होते. यामुळे जास्त करुन कोर्स कव्हर केला जातो. यामध्ये विषय विक असेल तर त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अशामध्ये कुठलाही विषय वीक असेल तर त्याची तयारी होऊन जाईल. संपूर्ण कोर्सची तयारी करावी. मला हे यश तिसऱ्या प्रयत्नात मिळाले आहे. मात्र, यासाठी मी खूप मोठा प्रवास केला आहे. यूपीएससीची तयारी करण्यासाठी मी स्वत:ला आयसोलेट केले होते, असे त्याने सांगितले.
Bangalore मधली नोकरी सोडली अन् घेतला मोठा निर्णय, पुण्याच्या तरुणाची अनोखी गोष्ट
जेव्हा मी पाच वर्षांचा होतो, तेव्हा वडिलांनी एटलास बुक घरी आणले आणि मला दिले. त्यामुध्ये पशु-पक्षी आणि प्राण्यांचे चित्र पाहून माझ्या मनात त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. यानंतर मी मोठा झाल्यावर निसर्गाविषयी माझ्या मनात ओढ निर्माण झाली. मित्र आणि कुटुंबासोबत मी अनेक नॅशनल पार्क फिरलो आहे. हे सर्व पाहिल्यावर एक वेगळा अनुभव यायचा. माझ्या मनाला एक वेगळा आनंद, शांततेची अनुभूती होत होती.
त्यामुळे कधी पर्यावरणासाठी काही करण्यासाठी संधी मिळाली, तर मी नक्की काही करेन, असा विचार केला होता. त्यासाठी मला तीन वेळा अपयश आले. मात्र, शेवटी मी यूपीएससीमध्ये यश मिळवले आणि मला नशिबाने जंगलात काम करण्यात संधी दिली आणि म्हणून आता जंगलांची सुरक्षा करणे माझी जबाबदारी आहे, असे मी सांगितले.