येणारी तिथी खूपच शुभ, सकाळी वडाची अन् सायंकाळी करा शनिदेवाची पूजा, अद्भुत योगात मिळेल दुपट्ट फळ
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
वट सावित्रीची पूजा तीन दिवस चालते. यावेळी ही पूजा 4 जून पासून सुरू होणार आहे. मात्र, वट सावित्रीचा उपवास हा 6 जून रोजी केला जाईल.
परमजीत कुमार, प्रतिनिधी
देवघर (झारखंड) : येत्या काही दिवसात ज्येष्ठ महिना सुरू होणार आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीला वट सावित्रीचा उपवास केला जाईल. वट सावित्रीच्या उपवासाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, अशी मनोकामना या उपवासाच्या दिवशी महिला करतात.
याबाबत देवघर येथील पागल बाबा आश्रम स्थित मुद्गल ज्योतिष केंद्राचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, विवाहित महिला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावस्या तिथीला वट सावित्रीचा उपवास करतात.
advertisement
वट सावित्रीची पूजा तीन दिवस चालते. यावेळी ही पूजा 4 जून पासून सुरू होणार आहे. मात्र, वट सावित्रीचा उपवास हा 6 जून रोजी केला जाईल. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, अशी मनोकामना करत निर्जला उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतील. वडाच्या झाडात सर्व देवी देवतांचा वास असतो, असे म्हणतात.
advertisement
Bangalore मधली नोकरी सोडली अन् घेतला मोठा निर्णय, पुण्याच्या तरुणाची अनोखी गोष्ट
यासोबतच या वर्षाच्या वट सावित्री पूजेच्या दिवशी खूप शुभ योग तयार होत आहे. या दिवशी गुरूवारी आणि रोहिणी नक्षत्रही आहे. या दिवशी शनि जयंतीही साजरा केली जाणार आहे. हा खूपच अद्भुत असा संयोग आहे.
केव्हा सुरू होणार अमावस्या तिथी -
ऋषिकेश पंचांगानुसार, अमावस्या तिथीची सुरुवात 5 जून रात्री 7 वाजून 23 मिनिटांनी होईल. तर दुसऱ्या दिवशी 6 जून रोजी रात्री 9 वाजून 19 मिनिटांनी समाप्त होईल. यासाठी उदया तिथीला मानत 6 जून रोजी वट सावित्रीचा उपवास केला जाईल. तर 6 जून रोजी सकाळी 9 वाजेपासून 11 वाजेपर्यंत पूजेचा मुहूर्त आहे.
advertisement
या दिवशी महिलांनी काय करावे -
वट सावित्री पूजेच्या दिवशी वट वृक्षाची पूजा आराधना करायला हवी. सोबतच लाल रंगाच्या धागा ज्याला मौली असेही म्हणतात, आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी तो 108 वेळा वडाच्या झाडाला गुंडाळायला हवा. सोबत वडाच्या झाडाला शेंदूरही लावावा. असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण नक्की होईल.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Jharkhand
First Published :
May 21, 2024 8:08 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
येणारी तिथी खूपच शुभ, सकाळी वडाची अन् सायंकाळी करा शनिदेवाची पूजा, अद्भुत योगात मिळेल दुपट्ट फळ