सोनापूरात घडली धक्कादायक घटना
सदर घटना ही चिखलदरा तालुक्यातील सोनापूर येथे 15 ऑगस्ट रोजी घडली. या दोन भावांवर स्वतः वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मुंगू दांडोळे (वय-45) असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर सुमित (वय-19) आणि अमित (वय-18) अशी मुलांची नावे आहेत.
वडिलांनी मुलांविरोधात दिली तक्रार
घडलेली घटना अशी की, सुमित आणि अमित हे मोबाईलमध्ये पाॅर्न बघत होते. ते त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले. ते त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या हातातील मोबाईल काढून घेतला. त्या दोघांना कानाखाली लगावल्या आणि तो मोबाईल विकून टाकला. वडील जेव्हा बाहेरून घरी आले तेव्हा दोघांनी मिळून वडिलांना जमिनीवर पाडले आणि सुमितने वडिलांवर चाकूने वार केले. ज्यात ते जखमी झाले.
advertisement
हे ही वाचा : Bhandara News: दारूड्याला हटकले, तर त्याने तिघांवर चाकूने केले वार; घटनेमागचं कारण ऐकून व्हाल थक्क!
हे ही वाचा : 'सासरी रहायचंय, तर 20 लाख आण', विवाहितेचा सासू-नणंदेकडून छळ; अमेरिकेतून आला पती आणि...