'सासरी रहायचंय, तर 20 लाख आण', विवाहितेचा सासू-नणंदेकडून छळ; अमेरिकेतून आला पती आणि...

Last Updated:

Crime News: 'पुण्यात फ्लॅट खरेदी करायचा आहे, माहेरून 20 लाख आण', अशा मागणीचा सतत तगादा लावत विवाहितेचा शारीरिक आणि मानसकि छळ करणाऱ्या...

Crime News
Crime News
श्रीरामपूर : 'पुण्यात फ्लॅट खरेदी करायचा आहे, माहेरून 20 लाख आण', अशा मागणीचा सतत तगादा लावत विवाहितेचा शारीरिक आणि मानसकि छळ करणाऱ्या पती, सासू आणि नणंद यांच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फ्लॅट खरेदीसाठी 20 लाखांची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही अहमदनगरच्या श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती येथील रहिवासी आहे. तिने आपल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे की, पुण्यात फ्लॅट खरेदीसाठी माहेरून 20 लाख रुपये आणण्याची मागणी सासरकडील मंडळींकडून होते. पती, सासू आणि नणंद या पैसे आणत नाही म्हणून शारीरिक आणि मानसिक छळ करतात.
पती अमेरिकेतून आला आणि तोही मागणी करू लागला
शहर पोलिसांनी पती शंतनू राजेंद्र गाडे, सासू छाया राजेंद्र गाडे आणि नणंद मयुरी परमानंद शिंदे (रा. गणोरे. ता. अकोले) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली आहे. पीडित महिलेचा पती अमेरिकेत नोकरी करतो. 2024 मध्ये पीडित महिलेचा विवाह मोठ्या थाटामाटात करण्यात आला होता.
advertisement
पीडितेच्या भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण
लग्नानंतर सासून पीडितेच्या स्त्रीधन काढून आपल्या ताब्यात घेतले होते. त्यानंतर खासगी नोकरीचा पगार सासूकडे देण्यास बजावले होते. पती अमेरिकेत गेल्यानंतर सासू आणि नणंद यांनी मानसिक छळ सुरू केला. 'जर सासरी कायमस्वरुपी राहायचं असेल तर माहेरून 20 लाख घेऊन ये', अशी मागणी करत होते. अमेरिकेतून पती ज्यावेळी घरी आला, त्यावेळी त्यानेही हीच मागणी केली. इतकंच नाहीतर तर श्रीरामपूरमध्ये जाऊन विवाहितेचा भाऊ अभय यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'सासरी रहायचंय, तर 20 लाख आण', विवाहितेचा सासू-नणंदेकडून छळ; अमेरिकेतून आला पती आणि...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement