Ratnagiri News: आईचा गळा चिरला, स्वतःच्या हाताची नस कापली, पोटच्या मुलाचं सैतानी कृत्य, पण का?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Ratnagiri News: वडिलांना कर्ज काढलं होतं, त्यानंतर स्वतः मुलानेही अनेक ठिकाणांहून कर्ज काढलं होतं. बेरोजगारही होता. कर्जाचा डोंगर तब्बल...
Ratnagiri News : वडिलांना कर्ज काढलं होतं, त्यानंतर स्वतः मुलानेही अनेक ठिकाणांहून कर्ज काढलं होतं. बेरोजगारही होता. कर्जाचा डोंगर तब्बल 1 कोटींपर्यंत गेला होता. कर्जदारांच्या सततच्या तगाद्यामुळे 2 महिन्यांपूर्वीच वडिलांना आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा कर्जदार मागे लागले. त्यामुळे वैतगालेल्या मुलाने धारदार चाकूने आईच्या गळ्यावर सपासप वार केले. नंतर स्वतः दोन्ही हाताच्या नसा कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना रत्नागिरी शहारातील शांतीनगर परिसरात घडली.
1 कोटींचं होतं कर्ज अन् कर्जदारांचा तगादा
समोर आलेल्या माहितीनुसार पूजा शशिकांत तेली (वय-45, रा. केदारलिंग प्रसन्न बंगला, भवानीमंडपजवळ, शांतीनगर, रत्नागिरी) असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अनिकेत शशिकांत तेली (वय-25) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर वडिलांना मुंबईत राहणाऱ्या मुलासाठी अनेकांकडून कर्ज काढले होते. त्यात अनिकेतनेही काही ठिकाणांकडून कर्ज काढले होते. तो स्वतःही बेरोजगार होता. कर्जाची रक्कम 1 कोटीपर्यंत होती.
advertisement
2 महिन्यांपूर्वी बापाने केली होती आत्महत्या
कर्ज देणाऱ्यांनी अनिकेतच्या मागे पैशांसाठी तगादा लावला होता. त्यामुळे कर्जाला कंटाळलेल्या अनिकेतने आईच्या गळ्यावरच सुरीने सपासप वार केले. बेडवर रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या आईला बघून त्याने स्वतःच्या हाताच्या नसा कापून घेतल्या. रक्तबंबाळ झालेला अनिकेत खालच्या मजल्यावर आला आणि आजीला घडलेला प्रकार सांगितला. आजीने शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या मुलाला माहिती दिली, त्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. या कर्जाचा बोजा वाढल्यामुळे 2 महिन्यांपूर्वीच अनिकेच्या वडिलांनी आत्महत्या केलेली होती.
advertisement
हे ही वाचा : 2 वर्षाच्या मुलाची आई, प्रियकराने लॉजवर बोलवलं अन् स्फोटकाची पावडर तोंडात भरून हत्या, प्रकरणात मोठा ट्विस्ट!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 27, 2025 10:51 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Ratnagiri News: आईचा गळा चिरला, स्वतःच्या हाताची नस कापली, पोटच्या मुलाचं सैतानी कृत्य, पण का?