2 वर्षाच्या मुलाची आई, प्रियकराने लॉजवर बोलवलं अन् स्फोटकाची पावडर तोंडात भरून हत्या, प्रकरणात मोठा ट्विस्ट!

Last Updated:

Woman Murdered In Mysuru Lodge : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एका 20 वर्षीय विवाहित महिलेची तिच्या प्रियकराने तोंडात स्फोटक पावडर टाकून हत्या केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे आणि आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

Woman Murdered In Mysuru Lodge
Woman Murdered In Mysuru Lodge
Lover Forces Explosive Powder Into Mouth : प्रेमप्रकरणामधून अनेक गुन्हे घडल्याचं प्रकार समोर येत असतात. मात्र, म्हैसूरमध्ये असा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, जे ऐकून तुम्हाला देखील कानावर विश्वास बसणार नाही. एका दोन वर्षाच्या मुलाची आई प्रियकराला लपूनछपून भेटत असे. एकदा प्रियकराने लॉजवर बोलवलं असताना मोबाईलचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली पण पोलिसांनी चौकशी केल्यानंतर प्रकरणात मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. नेमकं काय घडलं?

लॉजमध्ये दोघांमध्ये भांडण झालं अन्....

मृत महिलेचे नाव दर्शिता आहे, दर्शिता हुनसूरच्या गेरासनहल्ली गावची रहिवासी होती. दर्शिताचे लग्न केरळमधील एका तरुणाशी झाले होते, परंतु तिचे स्थानिक तरुण सिद्धराजूशी प्रेमसंबंध होते. दोघेही सालिग्राम तालुक्यातील भेरिया गावातील एका लॉजमध्ये राहत होते. लॉजमध्ये दोघांमध्ये भांडण झालं, त्यानंतर संतप्त सिद्धराजूने दर्शिताच्या तोंडात स्फोटक पावडर ओतली.
advertisement

पोलिसांचा संशय बळावला

आरोपी प्रियकर आणि दर्शितामधील संबंधांबद्दल माहिती मिळाली आहे. फॉरेन्सिक टीम हत्येत वापरलेल्या पावडरची चौकशी करत आहे. या प्रकरणी सालीग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला, असा बनाव प्रियकराने रचला होता. मात्र, लॉज कर्मचारी तिथे पोहोचले तेव्हा खोलीत मोबाईल फोन आढळला नाही अन् पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी नव्याने चौकशी सुरू केली.
advertisement

सिद्धराजने दिली गुन्ह्याची कबुली

दरम्यान, फोन खिडकीतून बाहेर फेकला फेकल्यातं आरोपीने सांगितलं. मात्र, पोलिसांना काहीही मिळालं नाही. पोलिस चौकशीदरम्यान आरोपी सिद्धराजने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. एफएसएल (फॉरेन्सिक तज्ञ) पथक तपासणी करत आहे. पोलिसांनी सांगितले की या संदर्भात सालिग्राम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
2 वर्षाच्या मुलाची आई, प्रियकराने लॉजवर बोलवलं अन् स्फोटकाची पावडर तोंडात भरून हत्या, प्रकरणात मोठा ट्विस्ट!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement