Nagpur News: आधी गाडीला धडक, मग तलवारीने वार; शेतातील पाण्यावरून पेटला वाद अन् घडला कांड!

Last Updated:

Nagpur News : 'शेतातील पाणी का अडवतो', यावरून दोघांमध्ये भांडणं झालं. त्याचा राग मनात धरून भररस्त्यात एकावर तलवारीने सपासप वार केले आणि...

Nagpur News
Nagpur News
Nagpur News : 'शेतातील पाणी का अडवतो', यावरून दोघांमध्ये भांडणं झालं. त्याचा राग मनात धरून भररस्त्यात एकावर तलवारीने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून धूम ठोकली. इतकंच नाहीतर पुरावे मिटवण्यासाठी आरोपीने हल्ल्यावर वापरलेली तलवार एका कालव्यात फेकून दिली. ही धक्कादायक घटना पारशिवनी येथे मंगळवारी (26 ऑगस्ट) सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. पोलिसानी आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे.
शेतातील पाणी अडविण्यावरून पेटला वाद
मिळालेल्या माहितीनुसार लालू आसाराम एकनाथ (वय-46, रा. सरोदी टोली, पारशिवनी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर लालू राणू भोयर (वय-35, रा. सरोदी टोली, पालोरा, ता. पारशिवनी) असे आरोपीचे नाव आहे. या दोघांच्यामध्ये महिन्यापासून शेतातील पाणी अडवण्यावरून वाद सुरू होते. भोयरने एकनाथला विचारले की, "त्याचा शेतात येणारे पाणी का अडवितो." यावेळी दोघांच्यात पाण्यावरून वाद झाला. त्यावेळी भोयरने एकनाथला जीवे मारण्याची धमकी दिली. पण नंतर वाद मिटला आणि भांडण संपले.
advertisement
भररस्त्यात गाडी ठोकली अन् केले वार
पण, भोयरच्या मनात एकनाथविषयी राग होता. मंगळवारी सायंकाळी एकनाथ त्याच्या दुचाकीवरून पारशिवनी-सावनेर मार्गाने घरी निघाला होता. त्याचवेळी भोयर आपली कार घेऊन तिथे आला आणि त्यांना एकनाथच्या गाडी जोरात धडक दिली. त्यात एकनाथ खाली पडला. त्यावेळी भोयरने तलवारीने वार केले आणि तिथून पळून गेले.
घटनेनंतर रस्त्यावरचे नागरिक जमा झाले आणि त्यांनी एकनाथला रुग्णालयात नेले. या प्रकरणा पारशिवनी येथे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि भोयरला अटक केली. तपासात कळाले की, भोयरने हल्ल्यात वापरलेली तलवार पालोरा परिसरातील एका कालव्यात फेकली. पोलिसांनी त्याची कार आणि तलवार दोन्ही जप्त केलेली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Nagpur News: आधी गाडीला धडक, मग तलवारीने वार; शेतातील पाण्यावरून पेटला वाद अन् घडला कांड!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement