Bhandara News: दारूड्याला हटकले, तर त्याने तिघांवर चाकूने केले वार; घटनेमागचं कारण ऐकून व्हाल थक्क!

Last Updated:

Bhandara News: दारूड्या तरुणाला हटकले असता, त्याने एकाच घरातील तिघांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. ही धक्कादयक...

Bhandara News
Bhandara News
Bhandara News: दारूड्या तरुणाला हटकले असता, त्याने एकाच घरातील तिघांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीररीत्या जखमी झालेले आहेत. ही धक्कादयक घटना सोमवारी (25 ऑगस्ट) रात्री 8 च्या सुमारास घडली. जखमी महिला प्रमिला मेश्राम (वय-42) यांच्या तक्रारीवरून ओपारा येथील आरोपी विनोदी ऊर्फ पिंटू लांजेवार याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ल्यापूर्वी नेमकं घडलं काय?
सविस्तर माहिती अशी की, संबंधित महिला तिच्या घरासमोर आपल्या मुलासोबत बोलत बसली होती. त्याचवेळी दारू पिऊन आलेला विनोद दारूच्या नशेत शिवीगाळ करू लागला. त्यामुळे महिलेच्या मुलाने त्याला हटकले असता विनोदने त्यांच्यासोबत भांडणं काढले आणि चाकूने हल्ला चढविला.
हल्ल्यात एकजण गंभीर जखमी
भांडणं पाहून महिलेचा पुतण्या संदीप मेश्राम धावून आला असता त्याच्यावरही वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झालेला आहे. घटना घडताच नागरिकांना धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयता हालवले. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाल्यामुळे पुढच्या उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आले आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
Bhandara News: दारूड्याला हटकले, तर त्याने तिघांवर चाकूने केले वार; घटनेमागचं कारण ऐकून व्हाल थक्क!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement