TRENDING:

Crime : तिने आर्ची सारखं 'त्या' परश्यावर प्रेम केलं, संसाराचं स्वप्नही पाहिलं, पण भावांना तेच खटकलं आणि...

Last Updated:

एका समाजातली अल्पवयीन तरुणी दुसऱ्या समाजातल्या तरुणावर प्रेम करत होती. यावरून तिचे सुफियान आणि महताब हे दोन भाऊ नाराज होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिल्ली, 18 डिसेंबर : गाझियाबादमधल्या एका तरुणीला दुसऱ्या समाजातल्या तरुणावर प्रेम केल्यामुळे जिवाला मुकावं लागलं आहे. दोन भावांनी तिची हत्या करून मृतदेह गंगानगरमध्ये फेकून दिल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बहिणीचं दुसऱ्या समाजातल्या मुलावर प्रेम होतं म्हणून तिथे दोन भावांनी तिची निर्घृण हत्या केली आहे. मुरादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. तिथल्या एका समाजातली अल्पवयीन तरुणी दुसऱ्या समाजातल्या तरुणावर प्रेम करत होती. यावरून तिचे सुफियान आणि महताब हे दोन भाऊ नाराज होते. बहिणीची हत्या करून दोघेही फरार होण्याच्या तयारी असताना ही घटना उघडकीस आली.आरोपी मुरादनगरच्या गंगा कालव्यावरून जात असताना पोलिसांनी त्यांना पकडलं. सुफियान हा मृत तरुणीचा सख्खा, तर महताब हा मामेभाऊ आहे.

advertisement

(वडिल आणि बहिणीच्या मृतदेहाजवळ तो बसून होता, वास येत होता तर टॅल्कम पावडर टाकायचा, सायको भाऊ असा का वागला?)

एसीपी नरेश कुमार यांनी सांगितलं, की `चौकशीदरम्यान अनेक गोष्टी उघड झाल्या. चौकशीनंतर दोन्ही आरोपींच्या सांगण्यावरून पीडितेचे कपडे, चप्पल, आधार कार्ड आणि ज्या टॉवेलने पीडितेची हत्या करण्यात आली तो जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.`

advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी तिच्या प्रियकराशी लग्न करण्यावर ठाम होती. याचा राग येऊन भावांनी कट रचला. दोघांनी बहिणीला गंगा कालव्याजवळ नेऊन टॉवेलने तिचा गळा आवळून खून केला. घटनेनंतर आरोपी संशयास्पद स्थितीत वावरताना पाहून पोलिसांनी चौकशी केली असता, संपूर्ण रहस्य उलगडलं. आरोपींनी बहिणीची हत्या करून तिला गंगा कालव्यात फेकून दिलं होतं. मृतदेहाच्या शोधात पोलीस, एनडीआरएफ आणि खलाशांच्या मदतीनं गंगा कालव्यात शोधमोहीम सुरू आहे; पण मृतदेह सापडलेला नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॅाटेल, मेस बंद, पण पुण्यात इथं विद्यार्थ्यांसाठी मोफत दिलं जातंय जेवण, Video
सर्व पहा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर रोजी सायंकाळी दोन संशयितांना मुरादनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी थांबवण्यात आलं. त्यांची कसून चौकशी केली असता, दोघांनी आपल्या बहिणीचा टॉवेलने गळा आवळून खून करून मृतदेह गंगा कालव्यात फेकून दिल्याचं सांगितलं. हत्येचं कारण विचारलं असता आरोपींनी सांगितलं की, 'आमच्या बहिणीचं एका तरुणावर प्रेम होतं. तो घरच्यांना आवडत नव्हता. त्यामुळे आम्ही बहिणीची हत्या केली.' या प्रकरणी गुन्हा नोंदवला गेला असून, पुढचा तपास सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Crime : तिने आर्ची सारखं 'त्या' परश्यावर प्रेम केलं, संसाराचं स्वप्नही पाहिलं, पण भावांना तेच खटकलं आणि...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल