या प्रकरणात समृद्धी शिवाजी जगदाळे (रा. वंजारवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) आणि तिचा मित्र स्वराज धालगडे अशी आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी आणि समृद्धी या दोघी एमजीएम येथील हॉस्टेलमध्ये एकाच खोलीत राहत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जानेवारी रोजी पीडित तरुणी खोलीत कपडे बदलत असताना, समृद्धीने संधी साधून मोबाईलच्या माध्यमातून तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ टिपले. हे चित्रित केलेले दृश्य तिने तत्काळ आपल्या मित्र स्वराज धालगडे याला पाठवले.
advertisement
शंकरपटात अमरावतीच्या वाघीणीची विजयी हॅट्रिक! शेतकऱ्याच्या पोरीनं जिंकलं सर्वांच मन
काही वेळाने हा प्रकार पीडित तरुणीच्या लक्षात येताच तिने समृद्धीला जाब विचारला. मात्र, चूक मान्य करण्याऐवजी समृद्धी आणि स्वराज यांनी तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, दोघांनी मिळून तिला मारहाण केली तसेच पोलिसांत तक्रार केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी समृद्धी जगदाळे आणि स्वराज धालगडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरळे करत असून, संपूर्ण घटनेचे सर्व पैलू तपासले जात आहेत.






