अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती या छोट्याशा गावाने विदर्भात आपली ओळख निर्माण केली आहे. कारण आहे 20 वर्षीय लक्ष्मी गजानन सोनबावणे. पारंपरिक पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या शंकरपट स्पर्धांमध्ये लक्ष्मीने महिलांसाठी प्रेरणादायी असा पराक्रम करून दाखवला आहे. कृषक सुधार मंडळ, तळेगाव यांच्या वतीने दरवर्षी तळेगाव दशासर येथे विदर्भ केसरी जंगी शंकरपट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महिलांसाठी विशेष शंकरपट आयोजित केला जातो. या प्रतिष्ठेच्या पटात लक्ष्मीने सलग तीन वर्षे विजय मिळवत हॅट्रटिक साधली आहे.



