काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता महिला भाविक गेस्ट हाऊसच्या बाथरूममध्ये अंघोळ करत होती, तेव्हा आरोपी सौरभची सावली तिला दिसली. सौरभ व्हिडिओ काढत असल्याचं महिलेला समजलं, हे पाहून घाबरलेली महिला किंचाळत बाथरूममधून बाहेर आली. महिलेचा आवाज ऐकून गेस्ट हाऊसमध्ये थांबलेले भाविकही बाहेर आले आणि त्यांनी पळत जाऊन आरोपीला पकडलं. भाविकांनीच आरोपी सौरभला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी सौरभच्या फोनची तपासणी केल्यानंतर त्याच्या फोनमध्ये अंघोळ करणाऱ्या महिलांचे 10 व्हिडिओ मिळाले.
advertisement
काय म्हणाली पीडित महिला?
'मी आंघोळ करत होते, तेव्हा अचानक माझं लक्ष एका सावलीकडे गेलं. कुणीतरी मोबाईलमधून माधा व्हिडिओ काढत असल्याचं दिसलं, हे पाहून मी घाबरले आणि कपडे घालून बाहेर आले', असं पीडित महिलेने सांगितलं आहे.
ज्या गेस्ट हाऊसमध्ये हा प्रकार घडला आहे, ते राम मंदिराच्या गेट नंबर 3 पासून 50 मीटर अंतरावर आहे. वाराणसीवरून काही भाविक राम मंदिरात दर्शनासाठी आले होते. संध्याकाळ झाल्यामुळे त्यांनी राम मंदिराच्या जवळच असलेल्या राजा गेस्ट हाऊसमधील 2 खोल्या बुक केल्या. यातल्याच एका महिलेचा व्हिडिओ सौरभने काढला. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.