दोन आरोपींना अटक, कसून चौकशी
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. करनैल सिंह (हरियाणा), धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तर, तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तिन्ही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले. दोन्ही आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाच्या परिसराची रेकी केली होती. आरोपी जवळपास दीड ते दोन महिन्यापूर्वी मुंबईत आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
advertisement
..अन् डाव साधला!
आरोपी मागील काही दिवसापासून बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी संधीची वाट पाहत होते. अखेर रात्री आरोपीकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपी मागील काही दिवसापासून कुर्ला परिसरात वास्तव्यास होते अशी देखील सूत्रांची माहिती सूत्रांनी दिली.
दोन्ही आरोपीच्या प्राथमिक चौकशीत मुंबई पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आहे. दोन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत फरार असलेला आरोपीच मुख्य सूत्रधार असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपीना या हत्येसाठी आधीच पैसे देण्यात आले होते. हत्येच्या एक दिवस आधी आरोपीना पिस्तुल पुरवण्यात आलेली होती. एका डिलिव्हरी बॉयच्या मदतीने त्याना पुस्तल देण्यात आले होते.
या टोळीशी संबंधित आहेत आरोपी
बाबा सिद्दिकी यांचे मारेकरी हे बिष्णोई गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे कोणती कारणे असतील, याचा शोध सुरू होता. संशयाची सुई लॉरेन्स बिष्णोई टोळीकडे होती. आता आरोपींचा संबंध या टोळीशी असल्याने पोलिसांचा तपासही त्याच दिशेने सुरू होणार आहे.
सलमान खान आणि बाबा सिद्दिकी यांच्यात चांगली मैत्री होती. लॉरेन्स बिष्णोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर, एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरावर बिष्णोई गँगने गोळीबार केला. पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोईचा सलमानची हत्या करण्याचा मोठा कट तपासादरम्यान उधळून लावला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे.
