Baba Siddique Death : तुरुंगात असलेला गँगस्टर बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार? आरोपींची ओळख पटली

Last Updated:

पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर, इतरांचा शोध सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर नेमका हल्ला कोणी केला, याबद्दल आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

Baba Siddique Death
Baba Siddique Death
Baba Siddique Shot Dead मुंबई :  राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेने एकच खळबळ उडाली. दसऱ्याच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर, इतरांचा शोध सुरू आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर नेमका हल्ला कोणी केला, याबद्दल आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

 बाबा सिद्धीकी यांची हत्या कोणी केली?

बाबा सिद्दीकी यांची हत्या कोणी केली याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती आहे. या हल्ल्याचा सूत्रधार हा तुरुंगात असलेल्या गँगस्टरकडे वळली आहे.
advertisement
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयाची सुई साबरमती कारागृहात बंदिस्त असलेल्या लॉरेन्स बिश्नोईवरही फिरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, मुंबई पोलिसांना किंवा दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला असे इनपुट मिळालेले नाहीत. पोलीस वेगवेगळ्या अँगलने या घटनेचा तपास करत आहेत. तर, सूत्रांच्या माहितीनुसार, साबरमती तुरुंगात असलेला लॉरेन्स बिष्णोई हा मागील 9 दिवसांपासून मौन व्रतावर आहे.
advertisement
सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्यात चांगली मैत्री होती. लॉरेन्स बिष्णोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तर, एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरावर बिष्णोई गँगने गोळीबार केला. पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोईचा सलमानची हत्या करण्याचा मोठा कट तपासा दरम्यान उधळून लावला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे.
advertisement

आरोपींची ओळख पटली...

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. करनैल सिंह (हरियाणा), धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तर, तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तीनही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच तिन्ही आरोपी बाबा सिद्धिकी याची वाट पाहत त्या ठिकाणी थांबले होते. मात्र, या तीन आरोपीं व्यतिरिक्त अन्य एक आरोपी हा या तीन आरोपींना सूचना करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मागील अनेक दिवसापासून बाबा सिद्धीकी यांना आरोपी फॉलो करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Baba Siddique Death : तुरुंगात असलेला गँगस्टर बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार? आरोपींची ओळख पटली
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement