Baba Siddiqui: फटाके वाजत असताना 3 जणांनी डाव साधला, बाबा सिद्दिकींसोबत त्या 10 मिनिटात काय घडलं?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Baba Siddiqui Death News: बाबा सिद्धिकी यांनी कित्येक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले. काँग्रेसचे एकेकाळचे ते बडे नेते राहिले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
मुंबई : एकेकाळचे काँग्रेसचे बडे नेते, तीन वेळा आमदार राहिलेले आणि आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेले ज्येष्ठ नेते बाबा सिद्धिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धिकी यांचे पुत्र झिशान यांच्या कार्यालयासमोर ते उभे राहिलेले असताना अज्ञातांनी सिद्धिकी यांच्या दिशेने तीन गोळ्या फायर केल्या. सिद्धिकी यांच्या छातीत गोळी लागल्याने रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्धिकी यांनी कित्येक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले. काँग्रेसचे एकेकाळचे ते बडे नेते राहिले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबई विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आज शनिवारी सायंकाळी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्धिकी हे त्यांचे पुत्र झिशान यांच्या कार्यालयासमोर थांबलेले असताना त्यांच्यावर तीन राऊंड फायर करण्यात आले. वांद्रे पूर्व येथे ही गोळीबाराची घटना झाली.
advertisement
झिशान यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्धिकी उभे होते. तिघे जण मोटार सायकलवरून आले. त्यांचा चेहरा रुमालाने झाकलेला होता. यावेळी सिद्धिकी यांच्या दिशेने तीन राऊंड फायर करण्यात आले. त्यातील एक गोळी सिद्धिकी यांच्या छातीवर लागली.
दसऱ्यानिमित्त दुर्गामातेची मिरवणूक सुरू होती. फटाकेही फुटत होते. त्याचवेळी तिघांनी बरोबर डाव साधला. सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करुन अज्ञात मारेकरी वेगात पळून गेले. निर्मल नगर पोलीस घटनेचा तपास करत आहेत. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केल्याची घटना
- वांद्रे पूर्व भागातील खेरनगर येथील राम मंदिर परिसरात ही घटना घडली
- तीन ते चार तरूणांकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला
- गोळीबार झाल्यावर बाबा सिद्दीकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले
- मात्र त्याआधीच त्यांनी सोडला होता प्राण
advertisement
या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेतले ताब्यात
- फटाके वाजवत असताना हा गोळीबार झाला असल्याची माहिती
- उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लीलावती रुग्णालयात संपर्क साधला
- लीलावती रुग्णालायचा परिसर कार्यकर्ते आणि समर्थकांनी भरलाय
- झिशान सिद्दीकी तसेच अभिनेता संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल
कशी घडली घटना?
- बाबा सिद्धिकी 9.15 मिनिटांच्या दरम्यान कार्यालयातून बाहेर पडले
advertisement
- बाबा सिद्धीकी हे कार्यालयाजवळ फटाके वाजवत असताना गोळीबार झाला
- फटाके फोडत असताना अचानक तीन जण गाडीतून उतरले
- तोंडावर रुमाल बांधून हे तीन जण आले होते
- त्यानंतर त्यांनी बाबा सिद्धिकी यांच्यावर तीन राऊंड फायर केले
- बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळील राम मंदिराजवळ हा गोळीबार झाला
-बाबा सिद्धिकी यांना छातीत एक गोळी लागल्यानंतर ते खाली कोसळले
advertisement
- त्यानंतर लोकांनी त्यांना लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल केले
- पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी झाले दाखल
- पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2024 10:53 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Baba Siddiqui: फटाके वाजत असताना 3 जणांनी डाव साधला, बाबा सिद्दिकींसोबत त्या 10 मिनिटात काय घडलं?