आता याच प्रकरणात आता बडा मासा गळाला लागला आहे. पोलिसांनी एका भाजपच्या नेत्याला अटक केली आहे. संबंधित नेता मागील दीड महिन्यांपासून फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. आता अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
शरद जमदाडे असं अटक केलेल्या भाजप नेत्याचं नाव आहे.
advertisement
शरद जमदाडे याला तुळजापूर तालुक्यातील कामठा गावातून अटक केली आहे. तो तुळजापूर पंचायत समितीचा माजी उपसभापती आहे. मागील दीड महिन्यांपासून तो फरार होता. तुळजापुरातील ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर आरोपी शरद जमदाडे विरोधात तालमवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जमदाडे फरार होता. अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत एकूण 36 आरोपींची नावं समोर आली होती. यातील 16 आरोपींना पकडण्यात पोलिसांना आतापर्यंत यश आलं आहे. अद्याप 20 आरोपी फरार आहेत. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, लवकर त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. ड्रग्ज प्रकरणात एका भाजप पदाधिकाऱ्याला अटक केल्याने आता राजकीय वर्तुळात देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
