डिलिव्हरी बॉय करणाऱ्या तरुणांमध्ये काही वाद झाल्यामुळे हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 'डिलिव्हरी करणाऱ्यांमध्ये काही वाद झाले. यात एका डिलिव्हरी बॉयला गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एफआयआर नोंदवण्यात येत आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वैयक्तिक वादामुळे ही हत्या करण्यात आली, का यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
मृत्यू झालेला डिलिव्हरी बॉय हा अविवाहित होता. तसंच काही दिवसांपूर्वीच तो पाटण्यामध्ये राहायला आला होता. पाटण्यामध्येच त्याने भाड्याने घर घेतलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
डिलिव्हरी बॉयला मारहाण
याआधी काहीच दिवसांपूर्वी ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयला बजंरग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार गाझियाबादमध्ये घडला होता, ज्याचा व्हिडिओही समोर आला. श्रावण महिन्यात मांसाची डिलिव्हरी करत असल्यामुळे डिलिव्हरी बॉयवर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला, तसंच त्याच्याकडून ज्या ठिकाणी डिलिव्हरी करायची आहे, त्याचा नंबरही घेतला. या नंबरवर कार्यकर्त्यांनी फोन करून महिलेला शिवीगाळही केली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी मनोज वर्मा याला अटकही करण्यात आली.