मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस अधीक्षक स्वपन गौतम मेश्राम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पांडे यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुलीची आजी भागमनिया देवी यांनी भारतीय न्यायसंहितेचं कलम 103 (1), 238 आणि 3 (5) अंतर्गत शिवसागर इथला रहिवासी विवेक चौहान (मुलीचा प्रियकर), त्याचा भाऊ अशोक चौहान आणि पुथर्वा इथली त्यांची चुलती उर्मिला देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याशिवाय या प्रकरणी पॉक्सो आणि एससी/एसटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातला मुख्य आरोपी विवेक चौहान याला अटक करून कारागृहात पाठवलं होतं; पण वैज्ञानिक पुरावे आणि मुलीच्या कुटुंबीयांच्या वागणुकीवरून एसआयटीला संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. त्यानंतर हे प्रकरण ऑनर किलिंगचं असल्याचं उघड झालं.
advertisement
मृत मुलगी अनुसूचित जातीतली होती. तिचे विवेक चौहानशी प्रेमसंबंध होते. दोघंजण पळून जाऊन लग्न करण्याचा विचार करत होते; मात्र मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. मुलीचे आजोबा आणि तिच्या दोन काकांनी मिळून मुलीच्या हत्येचा कट रचला. गुरुवारी रात्री मुलगी झोपली असताना त्यांनी तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह गावातल्या तलावात फेकून दिला.
एसडीपीओंनी सांगितलं, की मृत मुलीचे आजोबा घुरा पासवान, आजी भागमनिया देवी, चुलते राहुल कुमार आणि रवि कुमार यांना अटक केली आहे. या सर्वांनी कुटुंबाची अब्रू वाचवण्यासाठी मुलीचा खून केल्याचं कबूल केलं आहे.