TRENDING:

'तुम्ही चांगले आहात म्हणून घरी बोलावलं' कुटुंबाने मिळून व्यापाऱ्याला 'हॅनी ट्रॅप' लावून लुटलं, काँग्रेस पदाधिकारी तरुणीचं कांड

Last Updated:

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यामध्ये हा सगळा बनाव उघड झाला. भरत यांना लुटल्यानंतर आरोपी...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
देशभरात एकीकडी सायबर क्राईम आणि डिजीटल फ्रॉडच्या प्रकरणामध्ये गुन्हेगार काय शक्कल लढवतील याचा नेम राहिला नाही. तर दुसरीकडे हनी ट्रॅप सारख्या प्रकारामध्ये सहज सावज गळा लावण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. अशातच एका ऑटो पार्टस विक्रेत्याला हनी ट्रॅपमध्ये बसवलं आणि त्याच्याकडून १२ लाखांचे दागिने लुटले. या प्रकरणी अखेरीस पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका काँग्रेस पदाधिकारी सापडली आहे.
News18
News18
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात हा प्रकार घडला आहे. कोटा इथं ऑटो पार्ट्स व्यापारी आणि रामलीला कलाकार भरत भुतानी यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आलं. त्यांच्याकडून  १२ लाखांचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले. या प्रकरणाात काँग्रेसची पदाधिकारी रीता आर्य, तिचा नवरा राजेंद्र बुंदेला, मुलगी निधी आर्य आणि जावई विशाल आर्य  अशा चौघांना काच मिल परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

advertisement

काय आहे प्रकरण? 

भरत भुतानी हे रााजस्थान इथं राहणारे आहे. कोटा परिसरात त्यांचं ऑटो पार्टसचं दुकान आहे, त्यांना गांधीनगर इथल्या घरी बोलवण्यात आलं होतं. आरोपी रीता आर्य, तिचा नवरा, मुलगी आणि जावयाने हनी ट्रॅपमध्ये त्यांना फसवलं. भुतानींची ओळख इंदुरमध्ये झाली होती. त्यामुळे ते घरी आले होते. भरत हे ग्वाल्हेरमध्ये आले होते. रामलीलामध्ये ते काम करणारे एक कलाकार आहे. घरी आल्यावर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर भरत यांना रिताने खोलीत घेऊन गेली. त्यावेळी किचनमध्ये लपून बसलेल्याा राजेंद्र आणि विशालने तोंडाला कापड लाावून घरात प्रवेश केला. मोबाईलमध्ये दोघांचे व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओ व्हाायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून हातातील सोन्याची अंगठी, गळ्यातली सोन्याची चेन हिसकावून घेतली.

advertisement

पोलिसांनी आरोपींना पकडलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

घरातून सुटका झाल्यानंतर भरत याांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. भरत यांनी सांगितलेली सगळी हकीकत ऐकून पोलिसांना संशय आला. भरत यांच्याकडून तब्बल १२ लाखांचे सोन्याचे दागिने आरोपींनी लुटले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आरोपीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यामध्ये हा सगळा बनाव उघड झाला. भरत यांना लुटल्यानंतर आरोपी  रीता आणि निधी सुद्धा त्याच ठिकाणी पोहोचल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी लोकेशनच्या आधारे तपास करून चाारही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून  भरत भुतानी यांच्याकडून लुटलेले सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. सध्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पोलीस करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
'तुम्ही चांगले आहात म्हणून घरी बोलावलं' कुटुंबाने मिळून व्यापाऱ्याला 'हॅनी ट्रॅप' लावून लुटलं, काँग्रेस पदाधिकारी तरुणीचं कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल