मिळालेल्या माहितीनुसार, पेनिनसुला बारमध्ये महिला वेटरकडून ग्राहकांचे मनोरंजन करण्याच्या नावाखाली अश्लील हावभाव करत नृत्य सादर केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत हिललाइन पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी महिला वेटर ‘लैला मै लैला’ या गाण्यावर अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे निदर्शनास आले.
advertisement
आठ जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणी बार मालक हरेश फिसनानी, मॅनेजर शुभम जामदाडे, वेटर राजेश महल याच्यासह महिला वेटर नेहा शर्मा, पशिक्ष मेहरा, मधुरीमा घोष, मंजू बागडे आणि जनिया मेहमूद अन्सारी अशा एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे, कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे आणि ग्राहकांना चुकीच्या पद्धतीने आकर्षित करण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत.
अश्लीलतेविरोधात कठोर कारवाईची मागणी
पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच अशा प्रकारच्या बेकायदेशीर आणि आक्षेपार्ह कृत्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरातील बार आणि मनोरंजन केंद्रांवर नियमित नजर ठेवली जाणार असून नियमांचा भंग केल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडूनही अशा प्रकारच्या अश्लीलतेविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
