नातेवाईकाच्या घरी जेवायला गेले अन्....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराजने बुधवारी रात्री 11:42 वाजता 108 ला रुग्णवाहिका बोलावली. कॉलमध्ये यशराजने त्याची पत्नी राजेश्वरी जखमी असल्याचे सांगितले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, यशराज आणि राजेश्वरी बुधवारी रात्री एका नातेवाईकाच्या घरी जेवायला गेले होते आणि ते परतल्यानंतर लगेचच ही घटना घडली. रिव्हॉल्वरची गोळी लागल्यानंतर यशराज अस्वस्थ झाले, त्यांनी तातडीने पत्नीचे प्राण वाचावे यासाठी प्रयत्न केला. अँम्ब्युलन्स बोलवली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
advertisement
तिच रिवॉल्हवर उचलली अन् कानपट्टीला लावली
दोघांचीही व्हिसा प्रक्रिया सुरू होती. पुढच्या महिन्यात परदेश दौऱ्याचे नियोजन होते. राजेश्वरी देखील ट्रीपची तयारी करत होती. मात्र, पत्नीच्या अचानक जाण्याने यशराज यांना धक्का बसला. पत्नी गेल्याची माहिती मिळताच त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. यशराज यांनी बेडरूममध्ये पडलेली तिच रिवॉल्हवर उचलली अन् कानपट्टीला लावली अन् भावनेच्या भरात गोळी चालवली. त्याच त्यांचा देखील मृत्यू झालाय.
सवयीनुसार रिव्हॉल्व्हर फिरवत होता
यशराज सिंह गोहिल आणि त्यांची पत्नी काही दिवसांत परदेशात जाणार होते. त्याआधी बुधवारी संध्याकाळी ते फोईबा येथे जेवायला गेले होते. त्यानंतर ते घरी आले. भाऊ घरी आला आणि त्याच्या रोजच्या सवयीनुसार रिव्हॉल्व्हर फिरवत होता. यादरम्यान, चुकून एक गोळी निघाली आणि त्याच्या पत्नीच्या मानेला लागली.
मेरीटाईम बोर्डात क्लास टू ऑफिसर
दरम्यान, या प्रकरणात अशी माहिती मिळत आहे की मृत यशराज हा गुजरात मेरीटाईम बोर्डात क्लास टू ऑफिसर म्हणून काम करत आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याचे लग्न झाले होते. त्याचे कुटुंब किंवा आजूबाजूचे कोणीही याबद्दल काहीही बोलण्यास तयार नाही. पती-पत्नीमध्ये काय घडले आणि त्यांनी हे अंतिम पाऊल का उचलले याचा तपास पोलिस करत आहेत. सध्या पोलिसांनी पती-पत्नीचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
