हे संपूर्ण प्रकरण कुढ फतेहगढ पोलीस स्टेशनच्या बिचेट्टा गावातील आहे. यात 2019 मध्ये पत्नीने आपल्या पतीचा रंग काळा असल्याने त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिले होते आणि त्याची हत्या केली होती. हा खटला अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू असताना सोमवारी न्यायालयाने आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसंच तिला पंचवीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
advertisement
धक्कादायक! क्रिकेट खेळण्यावरुन वाद; तरुणाने निवृत्तीच्या मानेवर मारली बॅट, अन् सगळंच संपलं
सहाय्यक सरकारी वकील हरीश सैनी यांनी सांगितलं की, 15 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता प्रेमश्री उर्फ नन्ही हिने तिच्या झोपलेल्या पतीवर पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिलं होतं. या घटनेत सतयवीर 90 टक्के भाजला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा भाऊ हरवीर सिंग याने त्याच्या वहिनीविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
सैनी यांनी सांगितलं की, मृताचा भाऊ हरवीर सिंग याने न्यायालयात सांगितलं की, त्याच्या भावाचा रंग सावळा होता आणि त्याची वहिनी भावाला अनेकदा टोमणे मारत असे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अपरा जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार यादव यांनी 4 ऑक्टोबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी निर्णय देताना न्यायालयाने प्रेमश्री उर्फ नन्ही हिला दोषी ठरवत जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंड ठोठावला.
