धक्कादायक! क्रिकेट खेळण्यावरुन वाद; तरुणाने निवृत्तीच्या मानेवर मारली बॅट, अन् सगळंच संपलं

Last Updated:

भंडारा जिल्ह्यात क्रिकेट खेळण्यावरुन झालेल्या वादातून एकाचा जीव गेला आहे.

मानेवर बॅट मारून हत्या
मानेवर बॅट मारून हत्या
भंडारा 06 नोव्हेंबर (नेहाल भुरे, प्रतिनिधी ) : आजकाल तरुणांमध्ये क्रिकेट खेळण्याचं क्रेझ प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळत आहे. क्रिकेट बघण्यासोबत अनेकांना ते खेळायलाही भरपूर आवडतं. हे खेळ खेळणं चांगलंही आहे. मात्र, काही वेळा अशा काही घटना घडतात, ज्यामुळे हे खेळच जीवावर बेततात. सध्या अशीच एक अतिशय धक्कादायक घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे.
भंडारा जिल्ह्यात क्रिकेट खेळण्यावरुन झालेल्या वादातून एकाचा जीव गेला आहे. जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिखली गावात ही घटना घडली. यात दोन खेळाडूंमध्ये आपसात वाद झाला. तो वाद इतका विकोपाला गेला की, करण बिलवणे ( वय 21) यानी निवृत्तीनाथ कावळे (वय 24) याच्या मानेवर बॅटने वार केला. या घटनेत निवृत्तीचा मृत्यू झाला आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, दोघेही एकाच गावचे रहिवासी होते. ते खुल्या ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळत होते. मृतक आणि आरोपी हे इतर मित्रांसोबत क्रिकेट खेळत होते. यावेळी करण बिलवणे आणि निवृत्ती यांचा पुन्हा एक मॅच खेळू द्या, या कारणावरून वाद झाला. आरोपी करणने हातातील क्रिकेट खेळण्याच्या बॅटने निवृत्तीच्या पायावर मारलं, तेव्हा निवृत्ती खाली वाकला. त्याचवेळी आरोपीने पुन्हा बॅट निवृत्तीला मारण्यास उगारली असता ती निवृत्तीच्या मानेवर लागली. त्यामुळे निवृत्ती जागेवर बेशुद्ध पडला.
advertisement
जखमीला उपचाराकरता ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतकाचा मित्र प्रसाद धरमसहारे (वय 23, राहणार चिखली) यानी अड्याळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धक्कादायक! क्रिकेट खेळण्यावरुन वाद; तरुणाने निवृत्तीच्या मानेवर मारली बॅट, अन् सगळंच संपलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement