मोठी बातमी! जनावरांची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीने हल्ला, छ. संंभाजीनगर हादरलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जनावरांची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीनं हल्ला करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर, 5 नोव्हेंबर, अविनाश कानडजे : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जनावरांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करणाऱ्या आणि त्यानंतर त्यांची कारमध्ये कोंबून तस्करी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सिल्लेखान्यात जनावरे विक्रीसाठी येण्यापूर्वी पथकाने सापळा रचला. मात्र पोलिसांना पाहाताच आरोपींनी त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्यावर आरोपीने तलवारीने देखील हल्ला केला, मात्र वार चुकल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपींनी इजेक्शन देऊन आधी जनावरांना बेशुद्ध केले, त्यानंतर त्यांची कारमध्ये कोंबून तस्करी सुरू होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गुन्हे शाखेकडून सापळ रचण्यात आला. आरोपी पोलिसांच्या सापळ्यात अडकले. सिल्लेखान्यात जनावरे विक्रीसाठी येण्यापूर्वी पथकाने आरोपींना आडवले. मात्र पोलिसांना पाहातच आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला.
आरोपींनी पोलिसांच्या अंगावर कार घालत तलवारीनं वार केला. मात्र वार चुकल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी जहीर हसरउल्लाह खान, सुलतान मोहम्मद इकबाल पटेल आणि अबू साद अवार कुरेशी यांना अटक केली आहे. तर आरेफ कुरेशी हा तलवार घेऊन पसार झाला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 05, 2023 2:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मोठी बातमी! जनावरांची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तलवारीने हल्ला, छ. संंभाजीनगर हादरलं


