advertisement

T20 World Cup 2026 : पाकिस्तानने स्वत:च्या पायावर धोंडा मारलाय! तीन मॅच खेळून सेमीफायनलमध्ये कसं पोहोचणार? जाणून घ्या गणित

Last Updated:

Pakitsan Cricket T20 World Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जर पाकिस्तानने बॉयकॉट केला तर पाकिस्तानच्या हातून दोन पाईंट्स जातील त्यामुळे त्यांना उर्वरित तीन सामन्यांच्या जोरावर सेमीफायनलपर्यंत पोहोचावं लागेल.

Pakitsan T20 World Cup 2026 semifinal scenario
Pakitsan T20 World Cup 2026 semifinal scenario
Pakitsan Cricket T20 World Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या हाय-व्होल्टेज मॅच बाबतचा सस्पेन्स आता अधिकच वाढलाय. पाकिस्तान सरकारने या मॅचवर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिल्यानंतर 24 तास उलटले आहेत. मात्र, आता एडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या बहिष्काराबाबत आयसीसीला कोणताही अधिकृत मेल पाठवणार नसल्याचे समोर आलंय. पीसीबीच्या या भूमिकेमुळे क्रिकेट वर्तुळात गोंधळाचे वातावरण निर्माण झालं असून वादाचा हा चेंडू आता आयसीसीच्या कोर्टात आहे. अशातच तीन मॅच खेळाडू पाकिस्तान सेमीफायनलला कसं पोहोचणार? जाणून घ्या.

जर पाकिस्तानने बॉयकॉट केलं तर....

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जर आयसीसीला लेखी कळवलं नाही, तर तांत्रिकदृष्ट्या ही मॅच वेळापत्रकाप्रमाणे 'अ‍ॅक्टिव्ह' मानली जाईल. आयसीसी सध्या पीसीबीकडून औपचारिक पत्राची प्रतीक्षा करत आहे. जोपर्यंत अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत जागतिक क्रिकेट संस्था कोणतीही ठोस पावलं उचलू शकत नाही. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना जर पाकिस्तानने बॉयकॉट केला तर पाकिस्तानच्या हातून दोन पाईंट्स जातील त्यामुळे त्यांना उर्वरित तीन सामन्यांच्या जोरावर सेमीफायनलपर्यंत पोहोचावं लागेल.
advertisement

कसं असेल पाकिस्तानचं सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं गणित?

पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध 7 फेब्रुवारी होणार आहे. तर दुसरा सामना अमेरिकाविरुद्ध 10 फेब्रुवारीला असेल. त्यानंतर भारताविरुद्ध सामना होणार आहे, पण पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेतली आहे. त्यानंतर 18 फेब्रुवारीला पाकिस्तानचा सामना नामिबियाशी होईल. पाकिस्तानला काहीही करून तिन्हीच्या तिन्ही सामने जिंकावे लागणार आहे. पण नेदरलँड्स पाकिस्तानचा टांगा पटली करू शकतो. या स्पर्धेत नेदरलँड्सला डार्क हॉर्स मानले जात आहे. नेदरलँड्सने 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवलं आणि 2009 मध्ये नेदरलँड्सने इंग्लंडलाही हरवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय.
advertisement

सलमान आगा टॉससाठी मैदानात आला नाही, तर...

नियमांनुसार, टीम इंडियाचे कॅप्टन सूर्यकुमार यादव यांना मॅचच्या आदल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित राहावे लागेल. इतकेच नाही तर, मॅचच्या दिवशी सूर्याला टॉस साठी मैदानात उतरावे लागेल. जर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा टॉससाठी मैदानात आला नाही, तर रेफरी भारताला 'वॉकओवर' देऊन विजयी घोषित करतील आणि भारताच्या खात्यात 2 पॉइंट्स जमा होतील. त्यामुळे भारताला मात्र याची काळजी नाही. पण पाकिस्तानला मोठा फटका बसेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup 2026 : पाकिस्तानने स्वत:च्या पायावर धोंडा मारलाय! तीन मॅच खेळून सेमीफायनलमध्ये कसं पोहोचणार? जाणून घ्या गणित
Next Article
advertisement
NCP Merger: अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चेहरा? फॉर्म्युला आला समोर
अजितदादांनी सगळं ठरवलं होतं, कोण होणार होतं राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यात कोणाचा चे
  • गील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणांच्या चर

  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पडद्याआड झालेल्या बैठकांची माहिती समोर येऊ लागली

  • विलीनीकरणातील राष्ट्रवादीतील सत्ता वाटपाचं सूत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती

View All
advertisement